वर्ल्ड कप टी-20 चे समालोचन आता मराठीत होणार, मनसे इमपॅक्ट!

महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे समीकरण गेली अनेक वर्ष जपणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुन्हा एकदा आपला मनसे इम्पॅक्ट दाखवला आहे. नुकतीच IPL २०२१ संपली आणि याचे समालोचन (commentary) इतर भाषांसोबत मराठीत व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हॉटस्टार सोबत पत्रव्यवहार करत IPL चे समालोचन मराठीत करावे याची मागणी धरून ठेवली होती.

वर्ल्ड कप टी-20 चे समालोचन आता मराठीत होणार, मनसे इमपॅक्ट!
टी20 विश्वचषक ट्रॉफी

मुंबई : महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे समीकरण गेली अनेक वर्ष जपणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुन्हा एकदा आपला मनसे इम्पॅक्ट दाखवला आहे. नुकतीच IPL २०२१ संपली आणि याचे समालोचन (commentary) इतर भाषांसोबत मराठीत व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हॉटस्टार सोबत पत्रव्यवहार करत IPL चे समालोचन मराठीत करावे याची मागणी धरून ठेवली होती. त्यानंतर हॉटस्टारने आता झालेल्या सामान्यांचे समालोचन मराठीत केले.

यानंतर वर्ल्ड कपचे समालोचन मराठीत व्हावे अशी मागणी केली होती. मात्र, हॉटस्टारने या वर्षी ही मागणी पुर्ण होऊ शकणार नसल्याची माहिती ट्विट करत दिली होती. मात्र, एकदा का मनसेच्या हाती कोणता विषय गेला आणि तो मराठी भाषेसाठी असेल तर मनसे ती कामगिरी फत्ते केल्याशिवाय राहात नाहीच. आणि त्यामुळे हॉटस्टारने आता सूरु होणारी वर्ल्ड कप मॅच आणि त्याचे समालोचन मराठीत करणार असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. भारत – पाकिस्तान यांच्यातील मॅचपासून वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. आणि याच मॅचपासून मराठीतून समालोचन होणार आहे.

मराठी Commentry चा इतका हट्ट का? याला उत्तर देताना केतन नाईक म्हणतात कि, “विषय नुसता समालोचनाचा नसून त्यातून निर्माण होत असलेल्या अर्थकारणमुळे मराठी भाषेतील जाणकारांना रोजगार मिळणार असेल तर तो आम्हाला हवा आहे व अश्याच प्रकारचे काम राज साहेब ठाकरे त्यांना अपेक्षित असतं”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अनेकवेळा असे दिसून आले आहे की महाराष्ट्रात कोणताही प्रश्न असेल आणि तो मनसेच्या कोर्टात गेला तर त्याचा निकाल लागल्याशिवाय राहात नाही. त्यामूळे केतन नाईक यांनी हॉटस्टारला धारेवर धरून आणि मनसेचा दणका दाखवून ही कामगिरी पुर्ण केली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे केवळ नावापुरते मराठी भाषेला जपत आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या :

T20 World Cup मध्ये प्रत्येक वेळी भारताची पाकिस्तानवर सरशी, जाणून घ्या भारत-पाक सामन्यांचा आजवरचा इतिहास

T20 World Cup 2021, India vs England: सराव सामन्यात भारताची सरशी, इंग्लडवर 7 गडी राखून विजय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI