राज ठाकरेंची दिवाळी सफाई कर्मचाऱ्यांसोबत; कामगारांच्या खांद्यावर हात ठेवत फोटो

राज ठाकरेंसह त्यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरेही टेनिस खेळताना दिसतात. (Raj Thackeray Click Photo With BMC Cleaning Workers at Shivaji Park)

राज ठाकरेंची दिवाळी सफाई कर्मचाऱ्यांसोबत; कामगारांच्या खांद्यावर हात ठेवत फोटो


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे शिवाजी पार्कात टेनिस कोर्टात खेळत आहेत. नेहमीप्रमाणे राज ठाकरे टेनिस खेळायला गेले असताना शिवाजीपार्क परिसरात काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंकडे फोटो काढण्याची विनंती केली होती. यावेळी राज ठाकरेंनीही त्यांच्या विनंतीचा मान राखत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून दिलखुलासपणे फोटो काढला. (Raj Thackeray Click Photo With BMC Cleaning Workers at Shivaji Park)

मनसे नेते सचिन मोरे यांनी याबाबत फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. माणूसकी जपणारा संवेदनशील नेता, असे सचिन मोरे यांनी यात म्हटलं आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कमध्ये टेनिस खेळण्यासाठी जातात. याचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटोही व्हायरल होत आहे. राज ठाकरेंसह त्यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरेही टेनिस खेळताना दिसतात.

काल नेहमी प्रमाणे मनसे अध्यक्ष  राज ठाकरे शिवाजी पार्कात टेनिस खेळायला आले होते. त्यावेळी शिवाजीपार्क परिसरात काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. यानंतर राज यांनीही आपले हात या सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ठेवत दिलखुलासपणे फोटो काढला.

मुंबई दिवसरात्र स्वच्छ ठेवणाऱ्या या सफाई कर्मचारीऱ्यांना या फोटोच्या माध्यमातून खऱ्या अर्थांने कोविड योध्दा असलेल्याचं प्रशस्तीपत्रक दिवाळीत मिळालं आहे, असेही त्यांनी यात म्हटलं आहे.  (Raj Thackeray Click Photo With BMC Cleaning Workers at Shivaji Park)

संबंधित बातम्या : 

शिवाजी पार्क मैदानाचं नाव अखेर बदललं, नावाची अधिकृत पाटी लावली!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI