AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sandeep Deshpande : नरेस, सूरेस, परेस, यांना खुली सूट आणि मराठी माणसाला…खवळलेल्या संदीप देशपांडेंचा सवाल

Sandeep Deshpande : "हा दुबे आहे कुठे? बिहारला बसून इथे बोलणार महाराष्ट्राबद्दल. इथल्या लोकांना त्रास व्हावा, महाराष्ट्राच वातावरण मराठी विरुद्ध अमराठी तयार व्हावं. त्याचा फायदा निवडणुकीत उचलण्यासाठी भाजपच हे षडयंत्र आहे. त्याला आम्ही बळी पडणार नाही. भाजपने आतापर्यंत दंगली घडवून निवडणुका जिंकल्या आहेत असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

Sandeep Deshpande : नरेस, सूरेस, परेस, यांना खुली सूट आणि मराठी माणसाला...खवळलेल्या संदीप देशपांडेंचा सवाल
mns leader sandeep deshpande
| Updated on: Jul 08, 2025 | 9:39 AM
Share

“मला सरकारचं एक कळत नाही, त्या दिवशी सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले, आमच्याविरुद्ध मोर्चा काढला. त्यावेळेला मीरारोड-भाईंदरचं पोलीस प्रशासन झोपलं होतं का?. त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही. हे कुठलं सरकार आहे? हे महाराष्ट्राच सरकार आहे की गुजरातच सरकार आहे?” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारा. आज मीरारोड-भाईदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. “त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली, तर मोर्चा निघणार नाही का?. जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय, अटकाव करताय, तर सामान्य मराठी माणूस या मोर्चाच नेतृत्व करेल. मोर्चा निघेल म्हणजे निघेल. किती मराठी माणसांना तुम्ही नोटीस देणार आहात. किती मराठी माणसाना अटक करणार ते सरकारने आम्हाला सांगावं” असं संदीप देशपांडे म्हणाले.

“मला तेच विचारायच आहे, ही कुठली दडपशाही आहे. परवा आणीबाणी विरोधात भाजपने दिवस साजरा केला, मग ही आणीबाणी नाहीय का? महाराष्ट्रात मराठी माणसाने मोर्चा काढायचा नाही आणि गुजराती माणसाच्या मोर्चाला परवानगी हा दहशतवाद आहे सरकारचा. आम्ही या दहशतवादासमोर झुकणार नाही” असं संदीप देशपांडे यांनी ठणकावून सांगितलं. “आमच्या नेत्यांना अटक केली तरी, महाराष्ट्रात सामान्य मराठी माणूस या मोर्चाच नेतृत्व करेल” असं देशपांडे यांनी सांगितलं.

‘सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील’

“मोर्चा मराठी माणसासाठी होता. सामान्य मराठी माणूस या मोर्चाच नेतृत्व करेल. पण मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघेल. पोलिसांनी एका ठिकाणी व्यापाऱ्यांना खुली सूट द्यायची. नरेस, सूरेस, परेस, यांना खुली सूट द्यायची आणि मराठी माणसाला आत टाकायचं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील” असं संदीप देशपांडे म्हणाले.

‘आम्हाला चॅलेंज देणारे भय्ये कुठे निर्माण झाले?’

“ज्या पद्धतीने भाजपचे नेते, मग ते दुबे असतील ज्या पद्धतीने इथे प्रक्षोभक विधान करतायत. यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणायच्या आहेत. आम्ही या घाणेरड्या षडयंत्राला बळी पडणार नाही. महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करण्याचं भाजपाच षडयंत्र आहे. कशी आत त्या दुबेला आठवण आली. आम्हाला चॅलेंज देणारे भय्ये कुठे निर्माण झाले? हे जाणीवपूर्वक बिहार निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्र अशातं करण्याचा प्रयत्न चालला आहे. भाजपाच षडयंत्र आहे. म्हणून माथी भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय” असा दावा संदीप देशपांडे यांनी केला.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.