शिवसेनेच्या चर्चेत असलेल्या दोन्ही संभाव्य उमेदवारांना मनसेचा विरोध, महायुतीत नेमकं चाललंय काय?

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेला आज चांगलाच टोला लगावला आहे. शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. तरीही संजय निरुपम आणि रविंद्र वायकर यांच्या उमेदवारीला मनसैनिकांचा पाठिंबा गृहीत धरु नये, असं शालिनी ठाकरे स्पष्ट म्हणाल्या आहेत.

शिवसेनेच्या चर्चेत असलेल्या दोन्ही संभाव्य उमेदवारांना मनसेचा विरोध, महायुतीत नेमकं चाललंय काय?
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 5:15 PM

काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते संजय निरुपम यांच्यानंतर आता शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांच्या उमेदवारीला मनसेकडून विरोध करण्यात येतोय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला संजय निरुपम यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. यामुळे काँग्रेस हायकमांडने संजय निरुपम यांना पक्षशिस्तीचं पालन केलं नाही म्हणून निलंबित केलं. यानंतर संजय निरुपम यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होईल आणि त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. पण या चर्चा सुरु झाल्यानंतर मनसेने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. या विरोधानंतर ठाकरे गटातून शिवसेनेत आलेले नेते रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. पण रविंद्र वायकर यांच्याही उमेदवारीला मनसेकडून विरोध करण्यात आला आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत संजय निरुपम आणि रविंद्र वायकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.

शालिनी ठाकरे यांचं ट्विट नेमकं काय?

शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत भूमिका मांडली आहे. “मनसेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये”, अशा शब्दांत शालिनी ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे.

मनसेचा संजय निरुपम यांना विरोध का?

शालिनी ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. पण इतर ठिकाणी जे उमेदवार समोर येत आहे, त्यांना आमच्या महाराष्ट्रसैनिकांचा विरोध असल्याचं आता समोर येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आम्ही अशा लोकांचा प्रचार कसा करायचा? तुमच्याकडे उमेदवार नाहीत. तुम्ही आमच्या पक्षालाही पुढे येऊ देत नाहीत. त्या अनुषंगाने मी महाराष्ट्र सैनिकांची भूमिका व्यक्त केलेली आहे”, अशी प्रतिक्रिया शालिनी ठाकरे यांनी दिली.

“संजय निरुपम यांनी मराठी माणसासाठी कधीही काहीही केलेलं नाही. आमचा वाद उत्तर भारतीय लोकांसोबत नाही. आमचा मुद्दा वेगळा आहे. पण संजय निरुपम सारखे नेते आहेत, जे स्वत:ला नेते म्हणत आहेत, ते अशाप्रकारचे वाद महाराष्ट्रात निर्माण करत आहेत. अशा भूमिकेचा आम्ही विरोध करतो”, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

मनसेचा रविंद्र वायकरांना विरोध का?

“मतदारांचं मत आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात ठेवूनच मी भूमिका मांडलेली आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात आम्ही फिरतोय. प्रत्येक विधानसभेत आम्ही फिरतोय. सगळ्यांचा त्यांना विरोध आहे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा या नावाला विरोध आहे. मनसेने मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. पण एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंच्या प्रस्तावाला विरोध होता आणि त्यांच्याकडेच उमेदवार नाही”, अशी टीका शालिनी ठाकरे यांनी केली.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.