‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’मध्ये मनसेची तिथीनुसार शिवजयंती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत मनसेच्या शिवजयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. त्याऐवजी राज ठाकरेंच्या शिवपूजन कार्यक्रमाला संमती देण्यात आली आहे MNS Shivaji Park Shivajayanti Celebration

'छत्रपती शिवाजी महाराज पार्क'मध्ये मनसेची तिथीनुसार शिवजयंती
Follow us
| Updated on: Mar 12, 2020 | 9:14 AM

मुंबई : दादरमधील प्रसिद्ध ‘शिवाजी पार्क’चं ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ असं नामकरण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंती साजरी केली. तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मनसे कार्यकर्त्यांनी शिवरायांना वंदन केलं. (MNS Shivaji Park Shivajayanti)

भगवा पोशाख घालून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मनसैनिकांकडून शिवरायांना मानाचा मुजराही देण्यात आला. गुरुवारी सकाळीच शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्याच महिन्यात तिथीनुसार औरंगाबादमध्ये शिवजयंती साजरी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर रवानाही झाले. औरंगाबादेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवजयंती साजरा करण्याचं मनसेचं नियोजन होतं. मनसेने जोरदार शक्तिप्रदर्शनाचाही घाट घातला होता. परंतु मनसेच्या शिवजयंती कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिवजयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्याऐवजी राज ठाकरेंच्या शिवपूजन कार्यक्रमाला संमती देण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेने हिंदुत्व आणि ‘संभाजीनगर’ नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे.

शिवसेनेकडूनही औरंगाबादेत शिवजयंती सोहळा रद्द करुन शिवपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असे. परंतु शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती सोहळा साजरा केला होता.

रायगडावर शिवरायांचा जयघोष

रायगड जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ, महाड’च्या मार्फत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर शिवसमाधीचे विधीवत पूजन करण्यात आले. जिल्ह्यातील मंडळांनी शिवज्योती नेण्यासाठी किल्ले रायगडावर गर्दी केली होती. यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.

रायगडावरुन आणलेल्या शिवज्योती गावोगाव गेल्यानंतर त्या ठिकाणी आज शिवजयंतीचा उत्सव साजरा होणार असून   शिवचरित्रावर जिवंत देखावे हे मुख्य आकर्षण असणारी जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरवणूक आज संध्याकाळी महाड शहरात काढली जाणार आहे. (MNS Shivaji Park Shivajayanti)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.