मनसे तिथीनुसार शिवजंयती साजरी करणार, औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन

शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती सुरु करण्याचा निर्णय घेतला असताना आता मनसेनेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार (MNS Shiv jayanti dispute) असल्याचे जाहीर केलं आहे.

  • विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:08 PM, 29 Feb 2020
मनसे तिथीनुसार शिवजंयती साजरी करणार, औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रात तारीख आणि तिथीचा वाद अद्याप सुरु (MNS Shiv jayanti dispute) आहे. शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती सुरु करण्याचा निर्णय घेतला असताना आता मनसेनेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचे जाहीर केलं आहे. मनसेने 12 मार्चला छत्रपत्री शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: उपस्थितीत राहणार (MNS Shiv jayanti dispute) आहेत.

औरंगाबादमध्ये मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे. येत्या 12 मार्चला मनसेकडून शिवजयंतीच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. तिथीनुसार शिवजयंती करण्याच्या या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या पालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेने मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दशरथे यांच्यावर देण्यात आली आहे.

दरम्यान हिंदूत्वाचा नारा देत भगवा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर यंदा प्रथमच मनसेने बुधवारी (19 फेब्रुवारी) तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. यामुळे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा हट्ट् मनसेने सोडला का अशी टीका मनसेवर करण्यात आली. तर दुसरीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचीही राजकीय खेळी खेळत असल्याचं बोललं (MNS Shiv jayanti dispute) आहे.