चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? शिंदे सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून?; संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सवाल

खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. चुंबनाचे राज्य सरकारला वावडे आहे काय? असा सवालच राऊत यांनी केला आहे.

चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? शिंदे सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून?; संजय राऊत यांचा 'रोखठोक' सवाल
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 8:17 AM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा चुंबन प्रकरणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? चुंबन प्रकरण हे अश्लील प्रकारात मोडते काय? नसेल तर मग शिवसैनिकांच्या घरावर धाडी मारून त्यांना अटक करण्याचे कारण काय? राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या ‘रोखठो’क या सदरातून हा हल्लाबोल चढवला आहे.

राज्यात एक जाहीर चुंबनाचे प्रकरण घडले. त्याने राज्याचं मनोरंजन होत आहे. शिंदे गटाच्या आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतले. त्याचे लाइव्ह प्रक्षेपणही झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. त्यानंतर शिवसैनिकांच्या घरावर धाडी मारून त्यांना अटक केली. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट वेगाने सोशल मीडियातून पोहचते त्याला कुणाला दोष देणार? असा सवाल करतानाच मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे का? यावर निर्णय व्हायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

हा लव्ह जिहादचाच प्रकार

चुंबन घेणे हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याची गरज काय? सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे हे अश्लील कृत्यात मोडते काय? याचा खुलासा झाला पाहिजे. तसेच अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांची सुटका झाली पाहिजे. राज्यातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणीस यांच्याबरोबर लव्ह जिहादचाच प्रकार केला. त्यांच्यासोबत उघडपणे अनैतिकपद्धतीने एकत्र राहत आहेत, याला काय म्हणावे? असा सवालही करण्यात आला आहे.

देशात भीतीचे वातावरण

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांवर भीतीच टांगती तलवार ठेवली आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलं. मोदी-शाह यांचे हे राजकीय यश त्यांनी निर्माण केलेल्या भीतीत आहे. कारण राज्यात आणि देशात सध्या भीतीचे वातावरण आहे. भीतीच्या माध्यमातूनच शोषण सुरू आहे. भाजपमध्ये सामील व्हा नाही तर तुरुंगात जा, असे सध्या सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

संघाच्या लोकशाहीत बसते काय?

संघाचे प्रमुख लोक आजही आणीबाणीवर टीका करतात. इंदिरा गांधी यांनी देशाचा कसा कैदखाना केला होता यावर प्रवचने देतात. मग भाजपच्या आजच्या राजवटीत जेलखान्याचे कोणते स्वरुप संघाला दिसते? विरोधकांना तुरुंगात टाकायचे हा फॅसिझम आहे. संघाच्या लोकशाही परंपरेत हे बस्ते काय? असा सवाही रोखठोकमधून करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....