पत्री पुलाचा गर्डर पुढे सरकला, रात्रभर खासदार श्रीकांत शिंदे कामाच्या ठिकाणी उपस्थित

अंतिम टप्प्यात आलेल्या पत्री पुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

पत्री पुलाचा गर्डर पुढे सरकला, रात्रभर खासदार श्रीकांत शिंदे कामाच्या ठिकाणी उपस्थित
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 7:44 AM

कल्याण : पत्रीपुलाचं उर्वरित 10 टक्के गर्डर लॉचिंगचे काम रात्रीच्या सुमारास रेल्वेवर विशेष ब्लॉक येऊन सुरु झाले. अंतिम टप्प्यात आलेल्या या पुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते. (MP Shrikant Shinde On Kalyan Patri Bridge Gardere Work)

पत्रीपुलाच्या सर्वात मोठ्या अशा 76 मीटर गर्डर लाँचिंगसाठी 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला. यातील पहिल्या दिवशी 21 नोव्हेंबरला या गर्डरचे नियोजित 40 मीटर ढकलण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. तर 22 तारखेला मेगाब्लॉक सुरू होण्यास झालेल्या विलंबामुळे 90 टक्केच काम होऊ पूर्ण शकले. उर्वरित 10 टक्के कामासाठी पुन्हा रेल्वेच्या विशेष ब्लॉकची आवश्यकता होती. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत लवकरात लवकर ब्लॉक मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रेल्वे प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री 1.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास विशेष ब्लॉक मंजूर केला.

मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास सुरु झालेले गर्डर लाँचिंगचे काम पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण झाले. श्रीकांत शिंदे हे सकाळप्रमाणेच मध्यरात्रीही काम पूर्ण होईपर्यंत याठिकाणी हजर होते. खासदारांनी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

200 कर्मचाऱ्यांनी 45 दिवसात तयार केला 100 वर्षीय पूल

पत्री पुलाचा गर्डर तयार करायला ग्लोबल स्टील या कंपनी प्रबंधनाला भरपूर मेहनत घ्यावी लागली. 700 मेट्रिक टनच्या या कार्डर मध्ये 25 किमी वेल्डिंग, 30 हजार बोल्टचा वापर करण्यात आला आहे.

100 वर्षाहून अधिक हा पूल टिकू शकेल असा दावा ग्लोबल कंपनीचे प्रमुख ऋषी अग्रवाल यांनी केला आहे. कोरोनाकाळात सर्व काही बंद असताना हा गर्डर 45 दिवसात तयार करण्यात आला. या गर्डरच्या कामासाठी 200 कर्मचारी दिवस रात्र काम करत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने या पुलाच्या आराखड्याचे काम पूर्ण होत आहे. सतत मीडियावर येणाऱ्या बातम्या पाहून वेळात पूल तयार करण्याचा मानस असल्याचे ग्लोबल स्टील कंपनीचे संचालक ऋशी अग्रवाल यांनी सांगितले.

(MP Shrikant Shinde On Kalyan Patri Bridge Gardere Work)

संबंधित बातम्या

कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डरचे 10 % काम अपूर्ण; काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक मेगाब्लॉक होणार?

कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डरचे काम सुरु, आदित्य ठाकरेंची उपस्थिती

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.