मुंबईः केंद्र सरकारकडून उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी आम्ही जाणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे. आजच्या खासदारांच्या बैठकीला आम्ही खासदार जाणार नाही कारण सध्या या बैठकीची चेष्ठा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परंपरेला काळीमा फासलाय आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांवर करण्यात आली आहे.