मुकेश अंबानींना संचालकानेच 17 कोटीचा चुना लावला

मुकेश अंबानींना संचालकानेच 17 कोटीचा चुना लावला

मुंबई : देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 17 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, मुकेश अंबानींना तब्बल 17 कोटींचा चुना लावून पसार झालेला हा व्यक्ती त्यांच्याच कंपनीमध्ये संचालक पदावर कार्यरत होता. सध्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुकेश शाह असे या फसवणूक करणाऱ्या संचालकाचं नाव […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 17 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, मुकेश अंबानींना तब्बल 17 कोटींचा चुना लावून पसार झालेला हा व्यक्ती त्यांच्याच कंपनीमध्ये संचालक पदावर कार्यरत होता. सध्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुकेश शाह असे या फसवणूक करणाऱ्या संचालकाचं नाव आहे.

मुकेश शाह हा मुकेश अंबानी यांच्या ईशा बिलटेक आणि ईशा इन्फ्राटेक या कंपन्यांमध्ये संचालक पदावर कार्यरत होता. याच कंपन्यांच्या माध्यमातून मुकेशने तब्बल 16.90 कोटी रुपयांची फसवणूक केली. मुकेश अंबानी यांच्या ‘सी विंड’ इमारत, जी कफ परेड येथे आहे, या इमारतीच्या डागडुजीच्या नावाखाली मुकेशने वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवले. त्यानंतर जेव्हा त्याला वाटले की, आता इतक्या पैशांमध्ये तो त्याच्या प्रेयसीसोबत आरामात राहू शकतो, तेव्हा त्याने अंबानी यांच्या कंपनीचा रामराम ठोकला. 2018 ला त्याने संचालक पदाचा राजीनामा दिला. तर सप्टेंबर 2018 पासून तो बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी 22 ऑक्टोबर 2018 ला घाटकोपर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या फसवणुकीचा प्रकार तेव्हा उजेडात आला, जेव्हा मुकेश शाहच्या जागेवर नवीन संचालक आले. नवीन संचालकांनी याबाबत चौकशी केली, तेव्हा अशा प्रकारची कुठलीही डागडुजी झाली नसल्याचं समोर आलं. तेव्हा मुकेश शाहने 17 कोटींची फसवणूक केल्याचं समोर आलं. त्यानंतर याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी याबाबत चौकशीला सुरुवात केली. पहिले त्यांनी ट्रान्सफर करण्यात आलेली रक्कम गोठवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुकेश शाह आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली. या दोघांकडून 75 लाख रुपये जप्त करण्यात आले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना या फसवणुकीचा खरा मास्टरमाइंड हा मुकेश शाह नसून कुणीतरी बंगाली बाबा असल्याचं कळालं. या दोघांनी त्या बाबाच्या सांगण्यावरुनच हा कारनामा केला होता. त्या बाबानेच मुकेशला वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सागितलं होतं. सध्या पोलीस त्या बंगाली बाबाचा शोध घेत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें