AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख…; अमोल मिटकरी काय म्हणाले?

Amol Mitkari on Sharad Pawar Statement About Dhananay Munde : शरद पवार यांनी एका मुलाखतीत धनंजय मुंडे यांना कठोर शब्दात टीका केली आहे. या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे. आपण दुखावलं गेल्याचं मिटकरी बोललेत. वाचा...

शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख...; अमोल मिटकरी काय म्हणाले?
| Updated on: May 01, 2024 | 6:33 PM
Share

एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. पण याच धनंजय मुंडे यांना विरोधी पक्ष नेता बनवाल होता. तेव्हा त्यांनी विधानपरिषदेत केलेल्या कामाचा गौरवोद्गार शरद पवार यांनी लोक माझे संगाती या पुस्तकात केला आहे. पण धनंजय मुंडे यांचा लहान समाज घटकांतील व्यक्ती म्हणून उल्लेख शरद पवार यांनी केला. त्यामुळे माझ्यासारख्या लहान व्यक्तीला वैयक्तिक दुःख झालं आहे, असं राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

शरद पवार काय म्हणाले होते?

एका मुलाखतीत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे यांची लायकी नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी टीका करणाऱ्या धनंजय मुंडे यांना सुनावलं. कशा- कशातून बाहेर काढलं, याची जाणिव धनंजय मुंडेंना नाही, असंही शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या घणाघाती टीकेवर आता आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार होता. पण आत्ता आम्हाला महायुतीमध्ये चार जागा या मिळाल्या आहेत. त्यामुळे ही संख्या एक पेक्षा जास्त आहे. आम्ही देखील सात जागांची मागणी केली होती. पण आम्हाला चार जागा मिळाल्या आहेत. आम्ही गडचिरोली, परभणीची जागा लढवली असती तर आमचा खासदार हा निवडणून आला. असता पण आत्ता महायुतीमध्ये आम्ही संतुष्ट आहोत, असं म्हणत महायुतीतील जागावाटपावर मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूरच्या लढतीवर मिटकरी म्हणाले…

कोल्हापूरच्या लढतीवर अमोल मिटकरी यांनी भाष्य केलंय. कोल्हापुरातील जनता ही खूप हुशार आहे. त्यामुळे मी इथे आज फिरत आहे. आपली काम दिल्लीत कोण करणार आणि संसदेत कोण मुद्दे मांडणार आणि दिल्लीत पुन्हा सत्ता कोणाची येणार? हे सगळं कोल्हापूर च्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे आमचा उमेदवार असलेले संजय मंडलिक हे जिंकतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.