AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होम क्वारंटाईनमधील रुग्णांना एकटं पाडू नका, मुंबई महापालिकेकडून डिजीटल पुस्तिका जारी

काळजी घेणाऱ्या नातेवाईकांसाठी आवश्यक ती सर्व माहिती देणारी डिजीटल पुस्तिका तयार करण्यात आली आहे. (BMC Digital book home quarantine patient)

होम क्वारंटाईनमधील रुग्णांना एकटं पाडू नका, मुंबई महापालिकेकडून डिजीटल पुस्तिका जारी
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
| Updated on: Apr 19, 2021 | 9:52 AM
Share

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे एकट्या मुंबईत पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गृह विलगीकरणातील रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आणि Project Step 1 संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. (Mumbai BMC issue Digital book for home quarantine patient)

होम क्वारंटाईनमधील रुग्णांसाठी डिजीटल पुस्तिका

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या मुंबईत 6 लाख 71 हजाराहून अधिक रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. या गृह विलगीकरणातील रुग्ण हे निराश झालेले असतात. त्यांना एकटेपणा जाणवत असतो. त्यामुळे गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी मदत क्रमांक तयार करण्यात आला आहे. या रुग्णांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांसाठी आवश्यक ती सर्व माहिती देणारी डिजीटल पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

मुंबईत गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची प्रकृती अचानक बिघडल्यास काय करावे किंवा काय करु नये, याची माहिती देणारी एक पुस्तिका प्रोजेक्ट स्टेप वन या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. तसेच होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना एकटं पाडू नये, त्यांच्याशी मोबाईल किंवा व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्कात राहावे. नातेवाईकांनीही त्यांची विचारपूस करावी, असे या पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे.

?मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 

18 एप्रिल, संध्या. 6 वाजता

२४ तासात बाधित रुग्ण -8,479

२४ तासात बरे झालेले रुग्ण-8,078 बरे झालेले एकूण रुग्ण- 4,78,039 बरे झालेल्या रुग्णांचा दर- 82%

एकूण सक्रिय रुग्ण-87,698

दुप्पटीचा दर- 45 दिवस कोविड वाढीचा दर (11 एप्रिल-17 एप्रिल)- 1.53%

राज्यातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख कायम

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. काल राज्यात 68 हजार 631 इतक्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 70 हजार 388 वर गेली आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनामृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

राज्यात काल मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. काल एकूण 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.58 टक्के आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 60 हजार 473 कोरोनाबाधित रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तसेच राज्यात काल 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के  झाले आहे.  (Mumbai BMC issue Digital book for home quarantine patient)

संबंधित बातम्या : 

गोवा, दिल्लीसह सहा राज्य कोविड संवेदनशील, महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे

Oxygen Express | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’; देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.