AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धमकीच्या फोननंतर किशोरी पेडणेकरांचा नांगरे-पाटलांना कॉल, परिचित व्यक्ती रडारवर

विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी आपल्याला आलेल्या धमकीची तात्काळ दखल घेतल्याचं किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) सांगितलं

धमकीच्या फोननंतर किशोरी पेडणेकरांचा नांगरे-पाटलांना कॉल, परिचित व्यक्ती रडारवर
| Updated on: Jan 06, 2021 | 12:45 PM
Share

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण जामनगरमधून बोलत असल्याचं सांगितलं. आपण लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्या कार्यालयात फोन करुन तक्रार दिल्याची माहिती पेडणेकरांनी दिली. सुरक्षा वाढवण्या संदर्भात मला विचारलं होतं, पण महापालिकेची सुरक्षा असल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं. (Mumbai Mayor Kishori Pednekar calls Vishwas Nangare Patil after threat calls)

जामनगरमधून महापौरांना फोन

“फोन करणारा मी जामनगरमधून बोलतोय, असं सतत बोलत होता. तीन-चार फोन आले, म्हणून मी उचलले. मी फोन स्पीकरवर ठेवला होता. फोन उचलल्यावर त्याने घाणेरड्या भाषेत बोलायला सुरुवात केली. अश्लील शिव्या दिल्या. जर पोलिसांना सांगितलंत, तर मारुन टाकेन, असं म्हणाला होता. मी लगेच विश्वास नांगरे पाटील यांच्या ऑफिसला फोन केला. त्यांनी दखल घेऊन लगेच पत्राद्वारे सगळी माहिती घेतली” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

“मी त्याच रात्री पाच दिवसांसाठी बाहेर गेले होते आणि 25 डिसेंबरला मुंबईत आले. माझं, माझ्या पीएचं आणि तिथे उपस्थित असलेल्या विशाखा राऊत यांचं स्टेटमेंट घेतलं असून गुन्हा नोंदवला आहे. फोन करणाऱ्याने खंडणी वगैरे मागितलेली नाही. माझा नंबर कुठेही मिळू शकतो, पण माझ्याबरोबर असलेल्या पीएचा नंबर सगळीकडे असू शकत नाही” असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

परिचित व्यक्तीही संशयाच्या घेऱ्यात

“पोलिस आरोपीचा नक्की शोध घेतील, माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. नेमका हा कोण व्यक्ती आहे, हे मलाही बघायचं आहे. हे धाडस कोणाचं हेच पाहायचं आहे. जेव्हा तो समोर येईल, तेव्हा नक्कीच मी त्याला सांगेन. एकतर परिचितांपैकी कुणी फोन केला असावा किंवा  माझ्याबद्दल खूपच वाईट मत असलेल्या एखाद्या व्यक्तीचा हात असावा किंवा धमकीमागे काहीतरी राजकीय विषय असावा, असा अंदाज व्यक्त केल्याचं पेडणेकरांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.