AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवाच्या काळात मास्क न घालण्याची चूक पडेल महागात; वाचा मुंबई पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन

Mumbai Police | गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण 13 विशेष पथकं तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबलचा समावेश असेल. मुंबईत एकूण 13 झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल.

गणेशोत्सवाच्या काळात मास्क न घालण्याची चूक पडेल महागात; वाचा मुंबई पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 12:52 PM
Share

मुंबई: राज्यात सुरु झालेल्या सणांमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्यामुळे महाविकासआघाडी सरकार, प्रशासन आणि पोलीस सध्या कमालीचे सतर्क झाले आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात मुंबईत सार्वजनिक मंडळे आणि इतर ठिकाणी प्रचंड गर्दी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे तुम्ही गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याची चूक केली तर ती तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते.

मुंबई पोलिसांच्या नियमावलीत नेमकं काय?

मुंबई पोलीस येत्या गुरुवारपासून मास्क न घालून रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहेत. सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्यात. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मास्क न घालून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण 13 विशेष पथकं तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबलचा समावेश असेल. मुंबईत एकूण 13 झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे काम ही पथके करतील.

मुंबईत गणेशोत्सव कसा साजरा होणार?

काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिका आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. यामध्ये गणेशोत्सवासाठीची नियमावली निश्चित करण्यात आली होती. मोठ्या मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जनस्थळी (चौपट्यावर) विसर्जन करता येणार आहे. तसेच ठराविक कार्यकर्त्यांसह हे विसर्जन करता येणार असून, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, असंही बैठकीत ठरलंय.

अशी असणार नियमावली?

? सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट राहणार

? घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी

? गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांना घ्यावी लागणार

?84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाणांची निर्मिती

?विसर्जन ठिकाणी महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल

?त्यानंतर महापालिका गणेश विसर्जन करणार आहे

?सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी 10 कार्यकर्त्यांना परवानगी

?लहान मुले आणि ज्येष्ठांनी विसर्जनच्या ठिकाणी जाऊ नये

?ऑनलाईन दर्शनाची सोय करावी

?नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी

? शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.

? सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत

? आरती, भजन, कीर्तन यादरम्यान होणारी गर्दी टाळावी.

? नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.

? गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची योग्य व्यवस्था करण्यात यावी

संबंधित बातम्या:

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, ‘या’ गोष्टींवर निर्बंध

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, मुंबईतल्या गणेश मंडळांचा पवित्रा, शासनाकडून सहकार्याची अपेक्षा

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.