Mumbai Pune Expressway Toll: मुंबई हायकोर्टानं ज्या मुंबई पुणे एक्स्प्रेस वे टोलच्या चौकशीचे आदेश दिलेत, त्याचा अख्खा हिशेब एका क्लिकवर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या टोल वसुलीची चौकशी केंद्रीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांना अर्थात कॅगनं करावी असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले. (mumbai pune expressway information marathi)

Mumbai Pune Expressway Toll: मुंबई हायकोर्टानं ज्या मुंबई पुणे एक्स्प्रेस वे टोलच्या चौकशीचे आदेश दिलेत, त्याचा अख्खा हिशेब एका क्लिकवर
सांकेतिक फोटो
prajwal dhage

|

Mar 18, 2021 | 3:51 PM

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या टोल वसुलीची चौकशी केंद्रीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांना अर्थात कॅगनं करावी असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले. या चौकशीतून येणारी माहिती नक्कीच धक्कादायक असणार आहे. कारण देशातल्या सर्वात बिझी रोडवरच्या या टोलवसुलीला काही घरबंधच नव्हता. त्यामुळं 4 सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कोर्टात धाव घेऊन याचिकांद्वारे वस्तुस्थिती कोर्टाच्या निदर्शनास आणली. ती पाहून हायकोर्टही अचंबित झाले. किती वर्षे तुम्ही ही टोलवसुली करत राहणार ? असा सामान्य लोकांच्या मनातलाच प्रश्न कोर्टानं प्रतिवादी असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीला विचारला. (Mumbai Pune expressway all detail information in Marathi)

त्यावर एमएसआरडीसीनं दिलेलं उत्तर ऐकलं तर तुमच्याआमच्यासारख्यांचे डोळेच पांढरे व्हायचे. टोलवसुलीची मुदत 15 वर्षांची होती, ती संपली, आणि अजून आम्हाला 22 हजार 370 कोटी आणि 22 लाख रुपये वसूल करायचे आहेत असं उत्तर एमएसआरडीसीनं दिलंय. हे ऐकल्यावर तर हायकोर्टसुद्धा आश्चर्यचकित झालं आणि त्यांनी थेट कॅगलाच कोर्टात बोलावून घेऊन आजच्या सुनावणीत तुम्हीच सारी चौकशी करा असे आदेश दिले. टोलवसुलीविरोधातल्या याचिकांमधल्या आरोपांची सखोल चौकशी करा आणि 3 आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडा, असेही आदेश कोर्टानं कॅगला दिले. एमएसआरडीसीच्या अकाऊंटसचीही तपासणी करावी आणि त्यावरही स्वतंत्र सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करा असंही हायकोर्टानं बजावलंय. त्यामुळं एमएसआरडीसीची आता चांगलीच पोलखोल होणार आहे.

टोल लावताना काय ठरलं होतं ?

मोटार व्हेइकल टॅक्स ऍक्ट 1958 नुसार 2004 मध्ये म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडला या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर टोल वसुलीचे अधिकार देण्यात आले. रस्त्यासाठी झालेला म्हणजे भांडवली आणि टोल वसुल करण्यासाठी येणारा असा दोन्ही खर्च वसूल करण्याचे अधिकार ‘म्हैसकर…’ला देण्यात आले. खालापूर व तळेगावमध्ये नाके उभारुन 15 वर्षांसाठी हे टोलवसुलीचे अधिकार दिले. ऑगस्ट 2004 ते ऑगस्ट 2019 असा हा 15 वर्षांचा कालावधी होता. या 15 वर्षात 918 कोटी रुपयांचे अपफ्रंट पेमेंटची वसुली करायची होती. शिवाय 4330 कोटी रुपयांची महसुली वसुलीही या टोलनाक्यावरुन करायची होती. पण 15 वर्षांच्या काळात 4,330 कोटींहून 2,443 कोटी जास्त अधिक म्हणजे 6,773 कोटी रुपयांची दणक्यात वसुली झाली. ही 2,443 कोटींची जादा वसुलीही म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चरने आपल्या खिशात घातले. कोर्टातल्या सुनावणीदरम्यान एमएसआरडीसीनं आम्हाला 30 वर्षे टोलवसुलीचे अधिकार आहेत असंही म्हंटलंय.

टोलवसुलीचे अधिकार देतानाच घपला

नियमानुसार टोलवसुलीचे आदेश काढताना सरकारनं मूळ प्रकल्पाला किती खर्च आलाय ते सांगितलंच नाही. ते सरकारनं कधीच सांगितलं नाही. दुसरे म्हणजे सरकार आणि प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीबरोबर बीओटी तत्वावर करार व्हायला हवा होता, तोही याबाबत झाला नाही. तिसरी गोष्ट म्हणजे टोलवसुलीची अधिसूचना काढताना प्रकल्पाच्या खर्चाच्या वसुलीसाठी येणारा खर्च जाहीर करायला हवा होता. तोही सांगितला नाही. 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार होते. प्रकल्प भाजपच्या नितीन गडकरींच्या पुढाकारानं झाला. पण काँग्रेस-राष्ट्रवादीनं प्रकल्प खर्चाची दणकून वसुली केली.

आदेशानंतरही वसुलीचे गौडबंगालच

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर होणारी टोलवसुली देशातली सर्वात महाग आहे. त्यामुळं याबद्दल कायम संताप व्यक्त होत आलाय. बरं ही वसुलीही कायम गौडबंगाल राहिलीय. वसुलीची माहितीच लोकांपर्यंत येऊ दिली गेली नाही. 2015 साली मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देऊन सारी माहिती वेबसाईटवर टाकण्यास सांगितले. पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. टोलवसुली सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व प्रकल्पांची माहिती टाकण्यात आली, पण टोलवसुलीबद्दल एक पेजही अपलोड केले नाही.

कसा आहे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ?

>>> मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 94.5 किलोमीटरचा आहे.

>>>  1990 मध्ये अशा प्रकारच्या महामार्गाची संकल्पना मांडली.

>>>  1994 ला प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 1,146 कोटी रुपये मांडला.

>>>  प्रकल्पाची जाहिरात येताच 133 निविदांची विक्री, प्रत्यक्षात 55 निविदा दाखल

>>>  1 जानेवारी 1998 ला सरकारकडून वर्क ऑर्डर बहाल

>>>  2002 पर्यंत प्रकल्पासाठी 1630 कोटींचा खर्च

>>> 2002 मध्ये हा एक्स्प्रेस वे पूर्णपणे वापरात आला.

>>>  मुंबई-पुण्यादरम्यानचा हा एक्स्प्रेस वे सहा पदरी आहे.

>>>  मुंबईजवळच्या कळंबोली तर पुण्याजवळच्या किवळेपर्यंत हा एक्स्प्रेस वे आहे.

>>>  पादचारी, दुचाकी, तीन चाकी, बैलगाडी, ट्रॅक्टरला या रस्त्यावर बंदी आहे.

>>>  कुठल्याही वाहनाला एक्स्प्रेस वे वर थांबता येत नाही.

>>>  दररोज किमान 43 हजार वाहने धावत असतात

>>>  एक्स्प्रेस वे रोज 1 लाख वाहने धावतील एवढ्या क्षमतेचा

>>>  2009 साली एक्स्प्रेस वे ला यशवंतराव चव्हाणांचे नाव

>>>  एक्स्प्रेस वे वर आधी वेगमर्यादा नव्हती, पण 2009 ला ताशी 80 किमीची मर्यादा घातली. पुढे 2019 ला ती ताशी 120 कि.मी.केली

इतर बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोलवसुलीची चौकशी करुन अहवाल सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचा कॅगला आदेश

Vamika | विराट-अनुष्काच्या नेमप्लेटवर आता ‘वामिका’चंही नाव, पाहा हा क्युट Photo

(Mumbai Pune expressway all detail information in Marathi)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें