AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरधाव टेम्पोची टॅक्सीला धडक, मुंबईत परेल ब्रिजजवळ भीषण अपघात

मुंबईतील परळ ब्रिजवर उभ्या असलेल्या टॅक्सीला भरधाव टेम्पोने टक्कर दिल्याने अपघात झाला (Mumbai Accident Parel Flyover)

भरधाव टेम्पोची टॅक्सीला धडक, मुंबईत परेल ब्रिजजवळ भीषण अपघात
परळ ब्रिजवर टॅक्सी आणि टेम्पोचा अपघात
| Updated on: Feb 09, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : मुंबईतील परळ भागात भरधाव टेम्पोने टॅक्सीला धडक दिली. या अपघातात टॅक्सीचं मोठं नुकसान झालं. अपघातात टॅक्सीचालक जखमी झाला आहे. (Mumbai Taxi Tempo Accident on Parel Flyover)

मुंबईतील परळ ब्रिजवर उभ्या असलेल्या टॅक्सीला भरधाव टेम्पोने टक्कर दिली. या अपघातात टॅक्सीच्या मागील बाजूचे नुकसान झाले आहे. फ्लायओव्हरवर उभं असताना टेम्पोने मागून धडक दिल्याचं टॅक्सीचालकाने सांगितलं. टॅक्सीचा नंबर MH 01 AT 3548 तर टेम्पोचा नंबर MH 04 JU 4377 आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई वाहतूक पोलिसांच्या टीमने प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

सांगलीत एकामागून एक गाड्या धडकल्या

एकामागून एक अशा पाच गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. सांगलीच्या नेर्ले येथील आशियाई महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सांगलीच्या नेर्ले गावाकडून महामार्गावरुन अज्ञात चारचाकी वाहनाने सरळ महामार्गावर प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमार्गे येणार एका कार चालकाने गाडीचा वेग कमी केला. त्यामुळे पाठीमागून अतिवेगात येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे हा अपघात झाला. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी झाली होती.

गाड्यांचे नुकसान, जीवितहानी टळली

या अपघातात मोटार कारसह मालगाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अनेक गाड्या या कोल्हापूरहून पुण्याला जात होत्या. यात मालगाडी, मोटार कार या गाड्यांचा समावेश आहे.  या अपघातामुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. या अपघातानंतर गस्ती पथकाचे पोलीस शेनेकर आणि त्यांची टीम ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावरील इतर वाहने मार्गस्थ केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही.

नवी मुंबईत हिट अँड रन

नवी मुंबईतील पामबीच रस्त्यावर अपघात करून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी ताब्यात घेतले. शनिवार रात्री दीड वाजता पामबीच मार्गावर दुचाकीला धडक देऊन आरोपी पळून गेला होता. रोहन अ‍ॅबॉर्ट (वय 32) याला पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केले असता बेलापूर कोर्टातून आरोपीला जामीन मिळाला आहे. कारच्या धडकेत अक्षय गमरे आणि संकेत गमरे या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला होता. मयत तरुण मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याची मुलं आहेत.

संबंधित बातम्या :

सांगली महामार्गावर भीषण अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या

नवी मुंबईत मर्सिडीजच्या धडकेत दोघा पोलिसपुत्रांचा मृत्यू, प्रसिद्ध हॉटेलियरचा मुलगा अटकेत

(Mumbai Taxi Tempo Accident on Parel Flyover)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.