Mumbai Temperature Today : मुंबईतील थंडीची लाट पुढचे तीन दिवस कायम राहणार, लोकलमधून प्रवास करणारे मुंबईकर गारठले

मुंबईतील तापमान 17 ते 20 अंशादरम्यान राहिल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज पहाटेच्या वेळी लोकलनं प्रवास करणाऱ्या चाकरमानी मात्र थंडीमुळं गारठल्याचं पाहायला मिळाले. 

Mumbai Temperature Today : मुंबईतील थंडीची लाट पुढचे तीन दिवस कायम राहणार, लोकलमधून प्रवास करणारे मुंबईकर गारठले
Maharashtra Cold (फोटो सौजन्य: के.एस.होसाळीकर ट्विटर)

मुंबई : बदलत्या वातावरणीय स्थितीमुळं राज्यात (Maharashtra Weather) काही ठिकाणी पावसाची (Unseasonal Rain) नोंद होतेय. राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट आली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतही (Mumbai) वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. मुंबईत आज सकाळी देखील थंडीची (Mumbai Cold Morning) लाट दिसून आली. हवेमध्ये गारवा जाणवत होता. मुंबईतील तापमान 17 ते 20 अंशादरम्यान राहिल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज पहाटेच्या वेळी लोकलनं प्रवास करणाऱ्या चाकरमानी मात्र थंडीमुळं गारठल्याचं पाहायला मिळाले.  भारतीय हवामान विभागानं पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यातील वातावरण थंड राहणार  असल्याचं सांगितलं आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात घट पाहायला मिळेल.

मुंबईतील आज सकाळचं तापमान

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं मुंबईत आज पहाटे तापमान कमी झालं होतं. मुंबईतील बऱ्याच ठिकाणी पारा 17 अंशावर पोहोचला होता. राज्यातील इतर शहरांसाठी पारा 17 अंशावर येणं ही वेगळी बाब नाही. मात्र, मुंबईत पारा 17 अंशावर येतो ही नवी बाब आहे.

मुंबईतल्या तापमानासंदर्भातील अंदाज

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी मुंबईतील थंडीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. मध्यरात्रीच्या वेळी ट्विट करत त्यांनी मुंबईकरांसाठी आणखी एक गारठलेली सकाळ अपेक्षित आहे, असं म्हटलं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी 20 अंश सेल्सियसच्या खाली तापमान गेल्याचं दिसून येत आहे. तर काही ठिकाणी 17 अंश तापमानाची नोंद होईल, असा अंदाज के. एस. होसाळीकर यांनी वर्तवला आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ येथील हवामान विभागाच्या केंद्रावर काल किमान तापमान 19 अंशावर पोहोचलं होतं. सांताक्रुझमध्ये 18.2 तर कुलाबा येथे 19.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

मुंबईच्या वातावरणात बदल

मुंबईत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. सकाळी थंड वातावरण तर दुपारच्या वेळी ऊन पडते. सायंकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवायला सुरुवात होते. 8 जानेवारीला मुंबईतील काही ठिकाणी पावसाची नोंद झाली होती. मुंबईत सायंकाळी थंडगार वारे वाहत होते.

मुंबईच्या बदलत्या वातावरणाचा अनेकांना फटका बसत आहे. मुंबईकरांना सर्दी, खोकला यासह इतर त्रास जाणवू लागल्याचं दिसून आलं आहे.

इतर बातम्या:

साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला, फळ बागांना मोठा फटका

Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात पावसाचा ॲलर्ट

Mumbai Temperature Today reach to 17 today expected by experts mumbaikar people facing cold wave

Published On - 7:32 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI