मुंबईः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या निकालानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आता एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे नागपूर विभागात महाविकास आघाडीने आपला उमेदवार निवडून आणला आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन महाविकास आघाडीने विजय मिळवल्याबद्दल भाजपला निकालात काढले आहे तर दुसरीकडे कोकण हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो त्या विभागात भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवल्याबद्दल शिंदे गटाने ठाकरे गटाला निकालात काढले आहे.