नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर, 321 कोरोना रुग्णांची वाढ, तर मुंबईत रुग्णवाढीचा वेग मंदावला

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 39 दिवसांवर गेला (Navi Mumbai Corona Patient Latest Update) आहे.

नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर, 321 कोरोना रुग्णांची वाढ, तर मुंबईत रुग्णवाढीचा वेग मंदावला
Namrata Patil

|

Jun 24, 2020 | 8:00 PM

नवी मुंबई/ मुंबई : नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. नवी मुंबईत आज दिवसभरात सर्वाधिक 321 कोरोना रुग्ण आढळले आहेत.  यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा 5 हजार 393 वर पोहोचला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Navi Mumbai Corona Patient Latest Update)

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. आज (24 जून) एका दिवसात नवी मुंबईत 321 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात बेलापूर 33, नेरुळ 51, वाशी 25, तुर्भे 16, कोपरखैरणे 41, घणसोली 54, ऐरोली 82, दिघा 19 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

तर एका दिवसात 85 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 3 हजार 086 इतका झाला आहे. तर नवी मुंबईत 3 कोरोनाबळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 180 इतकी झाली आहे.

मुंबईकरांना दिलासा, रुग्णवाढीचा वेग मंदावला

तर दुसरीकडे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 39 दिवसांवर गेला आहे. तसेच रूग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन आता 1.81 टक्के इतका झाला आहे.

मुंबईतील एच पूर्वची आघाडीही आणखी वाढली आहे. त्यामुळे दुपटीचा कालावधी 88 दिवसांवर पोहोचला आहे. एफ उत्तर – 82, ई -74, एल – 70 दिवस असा रुग्ण दुप्पटीचा कालावधी नोंदवण्यात आला आहे.

एच पूर्व विभागात यापूर्वी 1 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण वाढीचा सरासरी दर नोंदवण्यात आला होता. आज एच पूर्व विभागाचा रुग्णवाढीचा सरासरी दर 0.8 टक्के इतका आहे. तर एफ उत्तर आणि ई विभागांचा रुग्णवाढीचा सरासरी दर 0.9 टक्के इतका झाला आहे. एल विभागातही हा सरासरी दर 1 टक्क्यांवर आलेला आहे.

मुंबईत रूग्णवाढीचा सरासरी दर 24 विभागांपैकी 3 विभागात 1 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. तर 10 विभागांत रुग्णवाढीचा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी असून इतर 8 विभागातील सरासरी दर दीड टक्क्यांपेक्षा कमी आहे.  (Navi Mumbai Corona Patient Latest Update)

संबंधित बातम्या : 

वसईत कोरोनाचा विळखा, नायगाव कोळीवाड्यात आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद

सोलापुरात कोरोना मृतांची संख्या 40 ने वाढून 217 वर, लपवाछपवी प्रकरणी रुग्णालयांना नोटीस

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें