नेक्स्ट टार्गेट शाहरुख खान, पत्रकारांना एक महिन्याआधीच निरोप मिळाले होते; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टीवर केलेली छापेमारी हा निव्वळ फर्जीवाडा आहे. शाहरुख खान नेक्स्ट टार्गेट असल्याचं क्राईम रिपोर्टरांना एक महिन्या आधीच सांग्ण्यात आलं होतं. (Nawab Malik Alleges That Ncb Raid On Cruise Was Totally Fake In A Press Conference)

नेक्स्ट टार्गेट शाहरुख खान, पत्रकारांना एक महिन्याआधीच निरोप मिळाले होते; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
Nawab Malik
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Oct 06, 2021 | 3:37 PM

मुंबई: एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टीवर केलेली छापेमारी हा निव्वळ फर्जीवाडा आहे. शाहरुख खान नेक्स्ट टार्गेट असल्याचं क्राईम रिपोर्टरांना एक महिन्या आधीच सांग्ण्यात आलं होतं, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. नेक्स्ट टार्गेट शाहरुख खान असल्याचं एक महिन्यापूर्वीच क्राईम रिपोर्टरांना सांगण्यात आलं होतं. पत्रकारांना ऑफ दी रेकॉर्ड ही माहिती देण्यात आली होती. पत्रकारांनीच आता हे पुढे येऊन सांगितलं पाहिजे. त्यामुळेच हे प्रकरण आम्हाला फर्जीवाडा वाटत आहे, असं मलिक म्हणाले.

चौकशी झालीच पाहिजे

पब्लिसिटी हा एनसीबीचा मोठा खेळ झाला आहे. दीपिका पदुकोण प्रकरणात त्यांना मोठी पब्लिसिटी मिळाली. या पेक्षा प्रसिद्धीचं कोणतंच मोठं शस्त्र असू शकत नाही हे तुम्हाला माहीत आहेच. शाहरुख खान आणि भाजपचं काय नातं आहे हेही तुम्हाला माहीत आहे. असहिष्णूतेवर बोलणाऱ्यांना आम्ही बघून घेऊ अशी विधाने यापूर्वी झाली आहेत. तो गुन्हेगार आहे. आर्यन अॅडिक्ट आहे. तो लंडनमध्ये उपचार घेत होता, असं सांगितलं जातं. असेलही. पण तयार करण्यात आलेलं हे प्रकरण केवळ कुंभाड असून प्रसिद्धीचा स्टंट आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे, असंही त्यांनी सागितलं.

क्रूझवर ड्रग्ज नव्हतंच

एनसीबीने त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडलंच नाही, असा दवाही त्यांनी केला. तसेच मनिष भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? असा सवालही त्यांनी केला.

मग तो नक्की कोण?

एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढणायत आला. सेल्फी व्हायरला झाला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही असं सांगण्यात आलं. मग हा व्यक्ती नक्की कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.

अमली पदार्थाचे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे

काही फोटो एनसीबीनं जारी केलेत. त्यात काही अमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून जारी करण्यात आले आहेत. हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफीसचे आहेत. किरण गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट

स्वबळावर लढूनही भाजप नंबर 1, पण आघाडीची डोकेदुखी कायम; मनसेची साथ हवीच?

शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव

(Nawab Malik Alleges That Ncb Raid On Cruise Was Totally Fake In A Press Conference)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें