सर्वात मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी अटक होणार? नेमकं काय घडतंय?

'मला कोणत्याही क्षणी अटक होईल', असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी अटक होणार? नेमकं काय घडतंय?
जितेंद्र आव्हाडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 6:40 PM

मुंबई : ‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. पण केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी नेमके कोणाचे प्रयत्न सुरु आहेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ठाण्यात आगामी काळात महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घडामोडी घडणार आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

“मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक माहिती दिलीय. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘काही महिने आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलाय’

“निदान ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तसं माझ्या विरोधात एकही केस नाही. पण ही जेव्हा बातमी येते तेव्हा आश्चर्य वाटतं”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.

जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

या सर्व घडामोडींच्या दरम्यान जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मला अटक होऊ शकते, असं म्हटलं होतं. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जितेंद्र आव्हाड याबाबत काही चर्चा करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर याआधीही अटकेची कारवाई

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. संबंधित प्रकरण मिटल्यानंतर लगेच ठाण्यातील विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोपाप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित प्रकरणी खूप प्रयत्न केल्यानंतर आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आल्यामुळे ते आतून खचले होते. त्यांनी थेट राजकारण सोडण्याचं वक्तव्य केलं होतं. संबंधित प्रकरणं मिटली असताना आता आव्हाडांनी माध्यमांसमोर येत नवीन दावा केला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.