सूनेचे विवाहबाह्य संबंध, आमदार विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप

सूनेचं व्हॉट्सअॅप चॅट माझ्या मुलाच्या नजरेस पडलं तेव्हा तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर मुलाने घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर सूनेने छळाची तक्रार दिल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला आहे

सूनेचे विवाहबाह्य संबंध, आमदार विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Mar 03, 2020 | 12:03 PM

मुंबई : सूनेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी सूनेवरच गंभीर आरोप केले आहेत. आपल्या सूनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला आहे. (Vidya Chavan allegations on daughter in law)

‘माझी सून माझ्याविरोधात तक्रार का करते, हा माझ्यासमोरही प्रश्न आहे. माझा मुलगा इंजिनिअर आहे. मुलगा अजित दहा डिसेंबरला त्याची पत्नी आणि 5 वर्षांच्या मुलीसोबत डेन्मार्कला जाणार होता. आठवडाभर आधी सूनेचा मोबाईल बिघडला, तेव्हा तिने माझ्या मुलाला तपासण्यास सांगितलं. त्यावेळी तिचं व्हॉट्सअॅप चॅट माझ्या मुलाच्या नजरेस पडलं. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजल्याने माझ्या मुलालाही मोठा धक्का बसला’ असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.

‘दहा वर्षांच्या संसारानंतर पत्नीने फसवणूक केल्याचं समोर आल्यामुळे माझा मुलगाही हादरला. त्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तिला ईमेल पाठवला. आता हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात असल्यामुळे आणखी काही बोलणे उचित ठरणार नाही’ असं विद्या चव्हाण यांनी ‘टीव्ही9’शी बोलताना स्पष्ट केलं.

नातवासाठी छळल्याचा सूनेचा आरोप, आमदार विद्या चव्हाणांवर गुन्हा

‘तुझी सासू आमदार आहे. तिच्याकडून दोन-तीन कोटी रुपये मिळवून देऊ, असं आमिष तिला वकिलांनी दाखवलं असावं. आम्ही तिचा छळ केलेला नाही. कर नाही, त्याला डर कशाला?’ असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईतील विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातवाच्या जन्मासाठी सासरी छळ होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सूनेने केला आहे. Vidya Chavan allegations on daughter in law

विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत चव्हाण, मुलगा अजित (तक्रारदार सूनेचा पती) दुसरा मुलगा आनंद आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने आपला छळ करण्यात येत होता, असा दावाही सूनेने केला आहे.

तक्रारदार सूनेला पहिली मुलगी आहे. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मात्र मुदतीआधीच प्रसुती झाल्याने बाळ दगावलं. त्यानंतर माझ्या छळात वाढ झाली, अशी तक्रार सूनेने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

विद्या चव्हाणांच्या सूनेने 16 जानेवारीला विलेपार्ले पोलिस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कलम 498 अ, 354, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेवरील आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्या दिंडोशी मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला.

विद्या चव्हाण अनेक चर्चांमध्ये राष्ट्रवादीची बाजू खंबीरपणे मांडतात. महिलांच्या मुद्दयावर कळकळीने बोलणाऱ्या विद्या चव्हाणांवरच सूनेच्या छळाचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. (Vidya Chavan allegations on daughter in law)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.