AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बनावट नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानाचा शोध लागला; एनआयएला मोठं यश

अँटेलिया स्फोटक प्रकरणात वापरण्यात आलेल्या बोगस नंबर प्लेटच्या दुकानाचा शोध लागला आहे. (NIA found fake number plate shop owner in thane)

बनावट नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानाचा शोध लागला; एनआयएला मोठं यश
fake number plate
| Updated on: Mar 15, 2021 | 1:29 PM
Share

मुंबई: अँटेलिया स्फोटक प्रकरणात वापरण्यात आलेल्या बोगस नंबर प्लेटच्या दुकानाचा शोध लागला आहे. ठाण्यातीलच हे दुकान असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनआयए या दुकान मालकाच्या मुसक्या आवळणार असून त्याच्याकडून मोठी माहिती हाती लागणार असल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. (NIA found fake number plate shop owner in thane)

अँटालिया स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे आल्यापासून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ठेवण्यात आली होती. तसेच अँटालिया ते मनसुख हिरेन प्रकरणात एक इनोव्हा गाडीही वापरण्यात आली होती. या गाड्यांची नंबर प्लेट बोगस असल्याचं आणि या गाड्यांमध्ये बनावट नंबर प्लेटही आढळून आल्या होत्या. त्यामुळे एनआयएने या बोगस नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकान मालकाचा शोध घेतला आहे. ठाण्यातील एका दुकानातच या प्लेट बनविण्यात आल्या होत्या. यातील काही नंबर खरे होते आणि काही खोटे होते. काही नंबर प्लेट अंबानींच्या ताफ्यातील गाड्यांचेही होते. त्यामुळे या दुकानाच्या मालकाला आता अटक केली जाणार आहे. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार असून त्याला या नंबर प्लेट बनविण्यासाठी कुणी ऑर्डर दिली. त्यासाठी किती पैसे देण्यात आले? आणि ही नंबर प्लेट कधी बनवली? याची माहितीही या दुकान मालकाकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे बनावट नंबर प्लेट बनविणारा खरा सूत्रधार शोधण्यात एनआयएला सोपं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कार सापडल्यानंतरही नंबर प्लेटचा घोळ कायम

24-25 फेब्रुवारीच्या रात्री 1 वाजता स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यात आली होती. त्या गाडीत अनेक नंबर प्लेट्स सापडले होते. तसेच स्कॉर्पिओलाही बनावट नंबर प्लेट लावण्यात आले होते. त्याचवेळी कारमध्ये एवढे नंबर प्लेट का ठेवण्यात आले? असा सवाल निर्माण झाला होता.

त्या कारचा नंबर प्लेटही बनावट

याच दरम्यान सचिव वाझे यांना क्राईम ब्रँचमधून हटवण्यात आलं होतं. तेव्हा आपला कोणी तरी पाठलाग करतंय असा दावा वाझेंनी केला होता. पाठलाग करणाऱ्या गाडीचा नंबर प्लेट बनावट होता, असं त्यांनी म्हटलं होतं. खाली आणि वर जे गाडीचे नंबर आहेत ते वेगवेगळे आहेत. पाठी आणि समोरच्या नंबर प्लेटवरील नंबरही वेगळे असल्याचं वाझे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार व्यतिरिक्त इतर कारही आल्याची माहिती समोर आली. ही इनोव्हा कार एनआयएने पहाटे 3.45 वाजता ताब्यात घेतली आहे. या कारमध्येही बनावट नंबर प्लेटचा वापर झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एक तर वाझेंकडून नंबर प्लेटचा खेळ केला जातोय किंवा या नंबर प्लेटच्या खेळात स्वत: वाझे अडकले आहेत, असं सांगण्यात येतं. (NIA found fake number plate shop owner in thane)

संबंधित बातम्या:

‘एनआयए’कडून सचिन वाझेंची झाडाझडती, ठाकरे सरकार सावध; वर्षावर शरद पवार-मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई पोलिसातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी NIAची तयारी; दिल्लीतील तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल

Breaking | सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

(NIA found fake number plate shop owner in thane)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.