शरजीलला आमच्याकडे सोपवा, परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही : नितेश राणे

नितेश राणे यांनी शरजीलविरोधात हल्लाबोल केला आहे (Nitesh Rane on Sharjeel Usmani).

शरजीलला आमच्याकडे सोपवा, परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही : नितेश राणे

मुंबई : “पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजील उस्मानीला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही, याची जबाबदारी आमची”, असं भाजप आमदार नितेश राणे ट्विटरवर म्हणाले आहेत. शरजील उस्मानी याने पुण्यात 30 जानेवारील रोजी एल्गार परिषदेत भाषण केलं होतं. त्याच्या भाषणातील काही मुद्द्यावर आक्षेप घेत भाजपने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे (Nitesh Rane on Sharjeel Usmani).

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

“शरजील नावाच्या कार्ट्याला अटक किंवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची. एल्गार काय असतो दाखवुन देऊ”, असं नितेश राणे ट्विटरवर म्हणाले (Nitesh Rane on Sharjeel Usmani).

शरजील उस्मानीबाबत फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शरजील विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. शरजील उस्मानी याने पुण्यात 30 जानेवारील रोजी एल्गार परिषदेत समस्त हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची गरज, अशा विषयावर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करुन त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

स्वारगेट पोलिसांतही तक्रार

Published On - 12:07 am, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI