AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणांमुळे रखडलाय एक रुपयातील उपचार !

दिवा, डोंबिवली आणि मुंब्रासारख्या गर्दीच्या स्थानकात आपत्कालीन आरोग्य केंद्र नसल्याने अपघातात जखमी होणाऱ्या प्रवाशांना वैद्यकीय मदत मिळणे दुरापास्त झाले आहे.

'या' कारणांमुळे रखडलाय एक रुपयातील उपचार !
local-accidentImage Credit source: local-accident
| Edited By: | Updated on: Dec 01, 2022 | 4:13 PM
Share

अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गर्दीचा पुर वाहणाऱ्या अनेक स्थानकांवर प्रवासी जखमी झाल्यास त्याला आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सुरु केलेले वैद्यकीय उपचार कक्ष बंद पडले आहेत. त्यामुळे जखमी प्रवाशांना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे बळी जात आहेत. गेल्याच आठवड्यात भायखळा स्थानकात प्रवासी रुळ ओलांडताना गंभीर जखमी झाल्याने 108 अ‍ॅम्ब्युलन्सला येण्यास उशीर झाल्याने त्याला टॅक्सीतून रुग्णालयात न्यावे लागल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.

मध्य रेल्वेच्या आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान राज्यराणी एक्सप्रेसवर दगड फेकल्याने एक प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. रेल्वे गाड्यांवर दगड भिरकावल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे.

दगड फेकीच्या अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना गर्दीच्या रेल्वे स्थानकात वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या 22 ईएमआर सुरु आहेत. तर 11 ईएमआर विविध कारणांनी बंद आहेत. मरीनलाईन, चर्नीरोड, महालक्ष्मी, लोअरपरळ, प्रभादेवी, खाररोड, सांताक्रुझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव आणि सफाळे अशा 11 स्थानकांत टेंडर संपल्याने किंवा अन्य कारणांनी ईएमआर बंद असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे स्थानकावर इमर्जन्सी मेडिकल रूम ( ईएमआर ) उभारण्यात आल्या आहेत. या इमर्जन्सी मेडिकल रुमचे कंत्राट वेळेवर न दिल्याने किंवा त्यासाठी कोणी पुढे न आल्याने जखमी प्रवाशांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दवाखान्यात नेईपर्यंत रक्तस्राव होऊन प्रवाशांचा बळी जात आहे.

डोंबिवली स्थानक गर्दीच्या बाबतीत मध्य रेल्वेचे दुसऱ्या क्रमांकाचे स्थानक आहे. डोंबिवलीची रोजची प्रवासी संख्या 2018-19 मध्ये 2,56,320 होती, ती आता  2,68,369 इतकी झाली आहे. तर घाटकोपरची प्रवासी संख्या 2,69,540 होती. ती आता 3,11,776 इतकी झाली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट 2022 या आठ महिन्यात मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिनही मार्गावर मिळून धावत्या लोकलमधून पडून तब्बल 415 तर रुळ ओलांडताना 767 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे

इमर्जन्सी मेडिकल रूम ( ईएमआर ) याबाबत ‘वन रुपी क्लिनिक’चे सर्वेसर्वा डॉ. राहुल घुले यांना विचारले असता त्यांनी डोंबिवली, घाटकोपर, भायखळा, विक्रोळी या पाच स्थानकावर एकाच कंपनीचे इएमआर सुरु होते. परंतू त्यांना ते चालविणे परवडत नसल्याने ते त्यांनी बंद केले असावे. मुंब्रा येथे आमचे ‘वन रुपी क्लिनिक’ लवकरच सुरु होत असल्याचे डॉ. घुले यांनी टीव्ही नाइन मराठी वेबसाइटला सांगितले.

दिवा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाला एका दिशेला  जमिनीवर उतार देण्यासाठी ठाणे पालिकेकडून अजूनही जागा मिळालेली नाही. त्यामुळे येथे जीव धोक्यात घालून रुळ ओलांडण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. तसेच दिवा येथे गर्दीमुळे लोकलमधून पडणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे.

दिवा येथे क्लीनिक उभे करण्यासाठी नाल्यावरची जागा दिल्याने क्लिनिक चालविण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याचे डॉ.घुले यांनी सांगितले. डॉ. घुले यांच्या ‘वन रुपी क्लिनिक’ला आता उत्तर-पूर्व रेल्वेनेही मान्यता दिली आहे. वाराणसी, छपरा आदी स्थानकांवरही आता एक रुपयात वैद्यकीय उपचार मिळणे शक्य होणार असल्याचे डॉ.घुले यांनी सांगितले.

इमर्जन्सी मेडिकल रूम ( ईएमआर ) उभारताना तेथील डॉक्टरांना प्रायवेट प्रॅक्टीसची परवानगी दिली पाहीजे. त्यांना मेडीकल स्टोअर उभारण्यास जागा दिली पाहीजेत, तरच ते प्रवाशांवर इमर्जन्सी उपचार मोफत करु शकतील, रेल्वे अपघातात जर प्रवाशाचा मृत्यू झाला तर रेल्वेला आठ लाखांची नूकसान भरपाई द्यावी लागते. त्यामुळे जर प्रवाशांचे प्राण वाचले तर उलट रेल्वेचेच पैसे वाचतील.

रेल्वेने संपूर्ण राज्यभरातील स्थानकांवर इमर्जन्सी मेडिकल रूम उभ्या करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी टीव्ही नाइन मराठीशी बोलताना सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येक रेल्वे स्थानकात जखमींच्या उपचारासाठी 108 अ‍ॅम्ब्युलन्स आणि इमर्जन्सी मेडिकल रूम ( ईएमआर ) नेमण्याचा आदेश दिलेला आहे. तसेच जखमींवर प्रसंगी खाजगी रूग्णालयात उपचार करून त्याचा खर्च केंद्र व राज्य सरकारने उचलण्याचे हायकोर्टाचे आदेश असल्याचे समीर झव्हेरी यांनी स्पष्ट केले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.