Ajit Pawar: राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजाराची चर्चा का होतेय? आघाडीचं गणित काय?; अजितदादा पहिल्यांदाच रोखठोक बोलले

Ajit Pawar: राज्यसभा निवडणुकीत आमची सरप्लस मते सेनेला देणार आहोत. गेल्यावेळी शिवसेनेने त्यांची अतिरिक्त मते आम्हाला दिली होती. त्यामुळे आता आम्ही त्यांना मते देणार आहोत.

Ajit Pawar: राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजाराची चर्चा का होतेय? आघाडीचं गणित काय?; अजितदादा पहिल्यांदाच रोखठोक बोलले
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 3:16 PM

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी राज्यसभा निवडणुकीवर (rajyasabha) मोठं विधान केलं आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे (bjp) दोन, दोन्ही काँग्रेसचे दोन आणि सेनेचा एक असे पाच सदस्य राज्यसभेवर निवडून येणारच आहे. आता सहावा उमेदवार सेनेने दिला आहे. आमची मतेही शिवसेनेलाच देणार आहोत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यसभेची निवडणूक ही मते दाखवून मतदान केली जाते. त्यामुळे घोडेबाजार होणार नाही. राहिला प्रश्न अपक्षांचा. तर अपक्ष मतदान दाखवत नाही. त्यामुळे घोडेबाजाराची चर्चा सुरू आहे. कमी पडणारी मते शिवसेना आणि भाजपला लागणार आहेत. काही अपक्ष शिवसेनेशी संलग्न आहेत तर काही आमच्याकडे आहेत. काही भाजपकडेही आहेत. त्यामुळे घोडेबाजारच्या अशा चर्चा सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या जनता दरबाराला अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

राज्यसभा निवडणुकीत आमची सरप्लस मते सेनेला देणार आहोत. गेल्यावेळी शिवसेनेने त्यांची अतिरिक्त मते आम्हाला दिली होती. त्यामुळे आता आम्ही त्यांना मते देणार आहोत. पक्षीय आमदार पोलिंग एजंटला मत दाखवतात. त्यांचा प्रश्न नाही. अपक्ष मते दाखवत नाहीत. दाखवल तर ती मतं बाजूला ठेवली जातात, असं अजित पवार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

असं आहे गणित

हितेंद्र ठाकूर यांची 3 मते आहेत. अबु आजमी, बच्चू कडू व एमआयएम यांची प्रत्येकी 2 मते आहेत. डाव्यांकडे एक मत आहे. मनसेकडेही एक मत आहे. इतर अपक्ष आमदार आहेत. त्यांच्यातील काहीजण शिवसेनेशी संलग्न झाले आहेत. काहीजण तटस्थ व काहीजण भाजपासोबत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

मलिक, देशमुखांच्या मतांसाठी कोर्टात

मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. न्यायालयात जात आहोत. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यासंबंधाची परवानगी न्यायालयाकडे मागणार आहोत. प्रयत्न कसोशीने करत आहोत, असेही त्यांनी सांगितलं.

आघाडीचे सहा उमेदवार जिंकणार

यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीवरही भाष्य केलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी दोन उमेदवार असतील. चार उमेदवार भाजपकडे आहेत. पण भाजप या निवडणुकीत पाचवा उमेदवार टाकण्याची माझी ऐकिव माहिती आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....