AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | आता दिवाळीनंतर OBC समाज उतरणार रस्त्यावर, मोठ्या आंदोलनाची तयारी

Maratha Reservation | दिवाळीनंतर OBC समाजाच राज्यभर मोठ आंदोलन होणार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यायला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली.

Maratha Reservation | आता दिवाळीनंतर OBC समाज उतरणार रस्त्यावर, मोठ्या आंदोलनाची तयारी
OBC Leader
| Updated on: Nov 07, 2023 | 1:15 PM
Share

मुंबई : “सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये. त्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे. ओबीसींच्या पावणेचारशे गरीब जमाती आहेत. आमच्या मुला-बाळांच, लेकरांच आरक्षण अशा प्रकारे कुणबी दाखले देऊन हडप करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु आहे. आम्ही ओबीसी नेते हे खपवून घेणार नाही” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकश शेंडगे यांनी दिला. “आम्ही भुजबळांना सांगितलं, तुम्ही मंत्रिमंडळात राहून संघर्ष करा. राजीनामा देऊन बाहेर पडू नका. आम्ही बाहेर राहून संघर्ष करु” असं प्रकाश शेंडगे म्हणाले. “हा संघर्ष आमच्या हक्काच्या आरक्षणाच संरक्षण करण्यासाठी आहे. सगळे ओबीसी भटके, विमुक्त रस्त्यावर उतरुन लढा सुरु करणार आहोत. दिवाळी संपली की, राज्यभर आंदोलन सुरु करणार आहोत” असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं.

“ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता. आधी सांगितलं, निजामाच्या नोंदी शोधत आहोत. सुरुवातीला 5 हजार, 11 हजार नोंदी निघाल्या, आम्ही मान्य केल्या. आता शिंदे समितीला संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधण्याच काम लावलं आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय ठरवायच हे षडयंत्र हाणून पाडणार” असं प्रकाश शेंडगे म्हणाले. “सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागस नाही हे दाखवून दिलय. आता कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय होतो का?. जात बदलण्याचा अधिकार कोणाला नाहीय. आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय सुद्धा केलाय. अशा प्रकारे कुठली समिती नेमून मागासवर्गीय ठरवू शकत नाही. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याची प्रक्रिया असते. राज्य मागासवर्गीय आयोग आहे” असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

‘ओबीसी रस्त्यावर येऊ शकत नाही असं समजू नये’

“आम्ही ओबीसींनी आवाहन करतोय. आम्हाला आमच्या हक्काच रक्षण करण्यासाठी रस्त्यावर याव लागेल. दिवाळीनंतर 17 तारखेला अंबडला, त्यानंतर 26 नोव्हेंबरला हिंगोलीला दुसरा मेळावा होईल” असं प्रकाश शेंडगे म्हणाले. “आम्ही आमची संख्या दाखवून देऊ. ओबीसी रस्त्यावर येऊ शकत नाही असं समजू नये. मरणाची लढाई लढण्याची पाळी आली तरी चालेल. गरीब, ओबीसी समाजाचा आरक्षणचा संरक्षण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही मतपेटीतून आमची ताकद दाखवून देऊ. ओबीसी समाज शांत बसणार नाही. ओबीसी समाज ठामपणे भुजबळांच्या पाठिशी आहे” असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.