AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन टायगर फत्ते! थेट लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून आज संध्याकाळी धमाका… ते पुरावे येणार समोर

Operation Tiger Shivsena Udhhav Thackeray Eknath Shinde: एकीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी सुरू असतानाच एक मोठा बॉम्ब आदळला आहे. ऑपरेशन टायगर फत्ते झाल्याचे मानले जात आहे. ओमराजे निंबाळकर यांनी नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रियेत जी नाराजी व्यक्त केली आहे, ती बरेच काही सांगून जाते.

ऑपरेशन टायगर फत्ते! थेट लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून आज संध्याकाळी धमाका... ते पुरावे येणार समोर
ऑपरेशन टायगर, शिवसेना, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 21, 2026 | 11:26 AM
Share

Operation Tiger Shivsena Udhhav Thackeray Eknath Shinde: ऑपरेशन टायगरचा फियास्को करण्यासाठी उद्धव सेनेने कंबर कसली आहे. पुण्यात सीक्रेट बैठक घेण्यात आली. मैत्रीच्या आणाभाका देण्यात आल्या. खासदार ओमराजे निंबाळकर यांना थांबवण्याचे येन केन प्रयत्न सुरू आहेत. तर धाराशिवला जाण्यापूर्वी ओमराजेंनी माध्यमांना एक तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी विधान परिषद निवडणुकीचा उल्लेख करत पराभव का स्वीकारावा लागला असा थेट सवाल केला. त्यातून त्यांनी उद्धव ठाकरे सेनेवरील नाराजी जाहीर केली. तर त्याचवेळी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहे. जणू ऑपरेशन टायगरची स्क्रिप्टच तयार नाही तर नाटकाची रंगीत तालीमही झाल्याचे समोर येत आहे. आज संध्याकाळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दिल्लीतूनही मोठा धमाका होण्याची चिन्हं आहेत.

स्वतंत्र गटाचे पुरावे थेट समोर

आज संध्याकाळपर्यंत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून शिवसेनेतून फुटलेल्या ६ जणांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे जाहीर करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हे सहा खासदार आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यासाठी हे सर्व खासदार संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व काही ठरलेले आहे. आता औपचारिकता तितकी बाकी असल्याचे समोर येत आहे. लवकरच सर्व चित्र जनतेसमोर येईल.

संजय राऊतांच्या दाव्यातील हवाच निघणार?

खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना ऑपरेशन टायगरविषयी विचारल्यावर, तांत्रिकदृष्ट्या सध्या हे सर्व खासदार आपल्याच पक्षात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधण्यात गैर का असे म्हटले. तर लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून, शिंदे सेनेकडून अथवा बंडखोरांनी अजून उद्धव सेना सोडल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. पण आज लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातूनच शिवसेनेतून फुटलेल्या सहा खासदारांचा स्वतंत्र गट स्थापनेचे पुरावे समोर येत असल्याची माहिती मिळत असल्याने राऊतांच्या दाव्यातील हवाच निघणार असल्याची चर्चा आहे.

ओमराजे निंबाळकरांचे मोठे संकेत

धाराशिवकडे निघताना पुण्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलाताना मोठे संकेत दिले. ते उद्धव ठाकरे गटात थांबण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी आणि त्यातून झालेल्या पराभवाचे मनन, चिंतन करणार असल्याचे सांगत उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. आज संध्याकाळी ते ही धमाका करण्याची शक्यता आहे.

Follow Us
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
Mumbai Rain Update | अखेर मुंबईत पावसाने लावली हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी