AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: लोकशाही धोक्यात येण्यास अपरिपक्व विरोधी पक्षच जबाबदार; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut: संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली.

Sanjay Raut: लोकशाही धोक्यात येण्यास अपरिपक्व विरोधी पक्षच जबाबदार; संजय राऊत यांचा हल्लाबोल
लोकशाही धोक्यात येण्यास अपरिपक्व विरोधी पक्षच जबाबदार; संजय राऊत यांचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 11:47 AM
Share

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उद्या भाजपचे नेते दिल्लीत जाणार आहेत. भाजप नेते दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार करणार आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली आहे. आधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. कायदा सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न असेल तर शिष्टमंडळासह मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे ही परंपरा आहे. नंतर राष्ट्रपती, युनायटेड नेशनकडे जाऊ शकता. पण काही झालं तर दिल्लीत जाता, हा काय तमाशा आहे. महाराष्ट्रात निवडून आलेलं सरकार आहे. हे कोणत्या लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत. लोकशाही आणि राज्यातील शांतता धोक्यात आणण्यात अपरिपक्व विरोधी पक्ष जबाबदार आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. महाराष्ट्र पोलीस सूड भावनेने काम करत नाही. मी चुकलो तरी माझ्यावरही कारवाई करतील. सोमय्यांविरोधात लोकांच्या मनात चीड आहे. आयएनएस विक्रांतचा घोटाळा लोकांना डिस्टर्ब करणारा आहे. लोकांकडून पैसा गोळा केला गेला. देशाची आणि जनतेची दिशाभूल केली. अशा व्यक्तीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली असतील दोन दगडं मारली असतील तर भाजपला दु:ख वाटण्याचं कारण काय? भाजपनेही अशा गोष्टीचं समर्थन केलं आहे. त्यांचं तेच मत राहिलं आहे. जे देशद्रोही आहेत, गुन्हेगार आहेत त्यांना माफ केलं जाणार नाही, असं भाजपच सांगायची, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ईडीची चौकशी सुरू असलेल्यांकडून सोमय्यांना डोनेशन

घोटाळा करणाऱ्या आरोपीच्या युवक प्रतिष्ठानचे सर्व अकाऊंट चेक केलं पाहिजे. त्यांचे डोनर्स कोण आहेत? कोणी त्यांना आतापर्यंत पैसे दिले आहे. दात्यांचं कॅरेक्टर काय आहे. त्यातील अनेक डोनर्स असे आहेत की त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून प्रतिष्ठानला पैसा आला आहे. ईडीच्या नावाने धमकावून पैसे घेतले आहेत. सोमय्या म्हणेल कागद कुठे आहे? तर कागद त्यांच्याकडेच आहे. सोमय्या कागद मागेल तर त्यांच्या तोंडात कागद देऊ, असं राऊत म्हणाले.

आता सेक्युरिटी घोटाळा

केंद्रा सरकार झेड प्लस, वायप्लस सेक्युरीटी देत आहे. तो सेक्युरिटी घोटाळा आहे. कोर्टात जसा दिलासा घोटाळा सुरू आहे. तसाच हा घोटाळा आहे. ममता बॅनर्जी आणि आमच्या विरोधात कुणी बोललं तर त्यांना लगेच संरक्षण दिलं जातं. तसा जीआरच काढलाय असं वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला. आज मुख्य न्यायाधीश यांचं स्टेटमेंट आलं आहे. आपण न्यायालयाचा विश्वास गमावत आहोत, असं त्यांनी सांगितलंय. वकिलीची परीक्षा पास झालेले फडणवीस हे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाहीत. सत्ता गमावल्यामुळे ते त्या मनस्थितीत दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

आक्रमक होण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे का?

नवनीत राणा, मोहित कंबोज आणि किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचं तुम्ही समर्थन करता का? असा सवाल राऊतांना करण्यात आला. त्यावर मी समर्थन करतो. शिवसेना समर्थन करते. कारण बोगस जात प्रमाणपत्रं घोटाळ्यातील आरोपी त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. ते आरोपीच आहेत. हायकोर्टाने त्याबाबत निर्णय दिला आहे. मुंबई पोलिसांचा अहवाल आहे. ते आरोपीच आहेत. असे आरोपी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणत असतील तर शिवसैनिक आक्रमक होणारच. तुमची मानखुर्दला गाडी फोडली तर तुम्ही नाही का आक्रमक झाला. आक्रमक होण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे का? आमच्या रक्तातच आक्रमकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही बेकायदेशीरपणे काही कृत्य करत असाल तर अतिरेकी कारवाया सहन केल्या जाणार नाही, असंही ते म्हणाले.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.