दक्षिण मुंबईत पाच मजली इमारतीचा भाग कोसळला, 34 जणांना बाहेर काढलं

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) फोर्ट परिसरात (Mumbai News) एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली.

दक्षिण मुंबईत पाच मजली इमारतीचा भाग कोसळला, 34 जणांना बाहेर काढलं
Mumbai part of building collapsed
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 10:10 AM

मुंबई : दक्षिण मुंबईतील (South Mumbai) फोर्ट परिसरात (Mumbai News) एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची  इमारत असल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत 34 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. याशिवाय 5 जण इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट हा उच्चभ्रू परिसर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Part of Apsara building collapses in south Mumbai Fort, many people rescued Mhada building )

बचाव पथकाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु केलं असून, नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत दुरुस्तीचं काम सुरु होतं. ही इमारत काही वर्ष जुनी आहे. त्यामुळे आतल्या बाजूने डागडुजी सुरु होती. ही म्हाडाची इमारत असून, जिथे डागडुजी सुरु होती, तिथेच पडझड झाल्याची माहिती मिळत आहे.

या इमारतीचा तिसरा आणि चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. पडझड सुरु होताच 34 रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. ते सर्व नागरिक सुखरुप आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

सध्या मुंबईत पावसाचा जोर नसला तरी जुन्या इमारतींना धोका कायम आहे. नुकतीच येऊन गेलेली वादळं, जोरदार पाऊस यामुळे जुन्या इमारतींचे काही भाग कोसळल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. मुंबई महापालिकेकडून जुन्या आणि धोकादायक इमारतींना नोटीस पाठवून, त्या रिकाम्या करण्याचे आदेश दिले जातात. आता ज्या इमारतीचा भाग कोसळला आहे, त्या इमारतीला अशा काही सूचना दिल्या होत्या का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या 

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.