‘कार्यकर्ते गादीवर, आमदार जमिनीवर’, साधेपणानं राहणारा अहमदनगरचा आमदार कोण?

आमदार निलेश लंके त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आमदारकीचा कोणताही बडेजाव न करता थेट लोकांमध्ये मिसळून काम करणं आणि कार्यकर्त्यांना बरोबरीची वागणूक देण्याची त्यांची वेगळी कामाची पद्धत आहे.

'कार्यकर्ते गादीवर, आमदार जमिनीवर', साधेपणानं राहणारा अहमदनगरचा आमदार कोण?


मुंबई : आमदार निलेश लंके त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आमदारकीचा कोणताही बडेजाव न करता थेट लोकांमध्ये मिसळून काम करणं आणि कार्यकर्त्यांना बरोबरीची वागणूक देण्याची त्यांची वेगळी कामाची पद्धत आहे. याचाच परिचय पुन्हा एकदा झालाय. बुधवारी (17 फेब्रुवारी) मुंबईतील आमदार निवासात निलेश लंके जमिनीवर झापल्याचं पाहायलं मिळालं. याचा एक फोटो कार्यकर्त्याने काढल्याने हा प्रकार समोर आला. आमदार लंके बुधवारी पहाटे मुंबईत आले, मात्र आमदार निवासात कार्यकर्ते झोपलेले दिसल्याने ते स्वतः खोलीतील एका कोपऱ्यात जमिनीवर झोपले (Photos showing Simplicity of MLA Nilesh Lanke in Mumbai).

आमदार निलेश लंके यांच्या मदतीच्या स्वभावामुळे केवळ पारनेर नगर मतदारसंघातीलच नाही, तर राज्यभरातील अनेक जण त्यांच्याकडे येतात. अनेकजण मुंबईत आले असताना त्यांच्या आमदार निवासाचा उपयोग करतात. स्वतः निलेश लंके यांनीच सर्वांना त्यांचा आमदार निवास उपलब्ध करुन देण्यास सांगितलंय. त्यामुळे आपल्या आमदारकीचा बडेजाव न करता सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या या सवयीने त्यांनी राज्यभरात हजारो कार्यकर्ते जोडले आहेत.

निलेश लंके यांनी मागील विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून प्रस्थापितांना धक्का देत दणदणित विजय मिळवलाय. सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्र विधानसभेतील मोजक्या तरुण आमदारांपैकी निलेश लंके एक आहेत. आमदार झाल्यापासून त्यांनी आपल्या मतदारसंघात अनेक कामं केलीत. विशेष म्हणजे कोरोना काळात भव्य कोरोना रुग्णालय उभं करण्यापासून लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यापर्यंत त्यांनी अनेक कामं केली. कोरोना काळात त्यांनी परप्रांतात अडकलेल्या हजारो मजुरांनाही मदतीचा हात दिला.

आमदार निवासात नेमकं काय घडलं?

बुधवारी कॅबिनेटची बैठक असल्याने आमदार निलेश लंके पहाटे 4 वाजता मुंबईतील आपल्या आमदार निवासात पोहोचले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून आलेले कार्यकर्ते झोपले होते. त्यामुळे त्यांनी या कार्यकर्त्यांना उठवले नाही. कार्यकर्त्यांची झोप मोड होऊ नये म्हणून ते स्वतः एका कोपर्‍याला असलेल्या जागेत झोपले. त्यामुळे कार्यकर्ते गादीवर आणि आमदार जमिनीवर असं दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं. एका कार्यकर्त्याने आपल्या मोबाईलमध्ये हे फोटो क्लिक केले. या फोटोत लंके यांच्यासोबत शिक्षक नेते बाळासाहेब खिलारी, दत्ता आवारी, संभाजी वाळुंज, दादा दळवी हेही आराम करताना दिसत आहेत.

निलेश लंके यांनी मुंबईच्या आकाशवाणीतील त्यांच्या आमदार निवासात सर्वांना राहण्याची मुभा दिलीय. त्यामुळे त्यांच्या निवासात नेहमीच गर्दी असते. विशेष म्हणजे याआधी देखील लंके यांचा कार्यकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतःची गैरसोय होऊ देणाचा स्वभाव समोर आला होता. म्हणूनच त्यांची ओळख सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणार आमदार अशी झालीय.

हेही वाचा :

नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली, आमदार निलेश लंकेंनी घेतली पवारांची भेट

गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर

आमदार निलेश लंकेंचा मोठा निर्णय, सत्काराऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन

व्हिडीओ पाहा :

Photos showing Simplicity of MLA Nilesh Lanke in Mumbai

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI