AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शरद पवार यांना एकच आव्हान, तुम्ही राहुल गांधींना….’, नरेंद्र मोदींचं चॅलेंज काय?

"इंडिया आघाडीवाले वारंवार संविधानाचा अपमान करत आहेत. बाबासाहेब धर्माच्या आधारे आरक्षणाच्या विरोधात होते. संविधान सभेने ठरवलं धर्माच्या आधारे आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला. पण इंडिया आघाडीवाले व्होट जिहाद करणाऱ्यांना धर्माच्या आधारे आरक्षण द्यायला निघाले आहे", असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

'शरद पवार यांना एकच आव्हान, तुम्ही राहुल गांधींना....', नरेंद्र मोदींचं चॅलेंज काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: May 17, 2024 | 9:10 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना उघडपणे चॅलेंज दिलं. महायुतीची आज मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या सभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना तुम्ही राहुल गांधींना सांगा जीवनभर वीर सावरकरांच्या विरोधात एक शब्द बोलणार नाही हे उदवून घ्या, असं चॅलेंज दिलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही सडकून टीका केली.

“नकली शिवसैनिकांनी बाळासाहेबांना धोका दिला. शिवसैनिकांचं बलिदान वाया घालवलं. सत्तेसाठी ते राम मंदिराला शिव्या घालणाऱ्या सोबत गेले, सावरकरांना शिव्या घालणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. मी शरद पवार यांना आव्हान देतो. तुम्ही राहुल गांधींना सांगा जीवनभर वीर सावरकरांच्या विरोधात एक शब्द बोलणार नाही हे राहुल गांधींकडून उदवून घ्या. कारण ते करणार नाही. निवडणुका झाल्यावर ते पुन्हा सावरकरांना शिव्या घालायला सुरुवात करतील. आता निवडणुका आहेत म्हणून त्यांच्या तोंडाला टाळं लागलं आहे”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

‘इंडिया आघाडीवाले व्होट जिहाद करणाऱ्यांना…’

“वोट बँकेसाठी तुष्टीकरणासाठी मुंबई आणि आघाडीला धोका दिला. या लोकांनी मुंबईत रक्तपात घडवला. त्यांना क्लिनचीट देत आहेत. सर्जिकल स्ट्राईक खोटी आहे म्हणून सांगत आहे. इंडिया आघाडीवाले वारंवार संविधानाचा अपमान करत आहेत. बाबासाहेब धर्माच्या आधारे आरक्षणाच्या विरोधात होते. संविधान सभेने ठरवलं धर्माच्या आधारे आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला. पण इंडिया आघाडीवाले व्होट जिहाद करणाऱ्यांना धर्माच्या आधारे आरक्षण द्यायला निघाले आहे”, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

“आर्टिकल ३७० रद्द करणारा मोदी हा संविधानाचा रक्षक आहे. जे आज संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्यांनी संविधानाचा आत्मा तोडला. संविधानात चित्र होते. पंडीत नेहरूंनी ते चित्रवालं संविधान कपाटात ठेवलं. त्यानंतर त्याची आत्मा काढून टाकली. त्यांनी संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. मी काँग्रेसला दलित आदिवासींचं आरक्षण काढून घेऊ देणार नाही. हीच वेळ आहे. ही भारताची वेळ आहे. काळाचं चक्र वेगाने फिरत आहे. मुंबईला मतदान करायचं आहे. सर्व रेकॉर्ड तोडायचे आहेत. आपल्या उमेदवारांना विजयी करून दिल्लीत पाठवायचं आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.