NCB नं मीडिया ट्रायल थांबवावी, कायदेशीर समन्स पाठवावं, प्रभाकर साईलच्या वकिलाचं एनसीबीला प्रत्युत्तर

एनसीबीनं मीडिया ट्रायल थांबवावी आणि आम्हाला कायदेशीर समन्स पाठवावं, असं तुषार खंदारे यांनी म्हटलंय. तर, प्रभाकर NCB च्या चौकशीला सामोरे जाईलच परंतु एवढी मोठी केंद्रीय यंत्रणा कायद्याचं पालन करत नाही असंही खंदारे म्हणाले आहेत.

NCB नं मीडिया ट्रायल थांबवावी, कायदेशीर समन्स पाठवावं, प्रभाकर साईलच्या वकिलाचं एनसीबीला प्रत्युत्तर
तुषार खंदारे
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 2:31 PM

अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर छापा टाकत आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यानं साक्षीदार के. पी. गोसावी, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डीलचा आरोप प्रभाकर साईल यानं केला होता. प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एनसीबीनं चौकशी सुरु केलीय. समीर वानखेडे यांचा बुधवारी जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी प्रभाकर साईल यानं एनसीबी कार्यालयात येऊन जबाब नोंदवण्याचं आवाहन केलं होतं. आता प्रभाकर साईलचे वकील तुषार खंदारे यांनी एनसीबीला उत्तर दिलं आहे.एनसीबी ही केंद्रीय तपास यंत्रणा आहे परंतु ती कायदेशीर काम आता करत नाही. एनसीबीनं मीडिया ट्रायल थांबवावी आणि आम्हाला कायदेशीर समन्स पाठवावं, असं तुषार खंदारे यांनी म्हटलंय. तर, प्रभाकर NCB च्या चौकशीला सामोरे जाईलच परंतु एवढी मोठी केंद्रीय यंत्रणा कायद्याचं पालन करत नाही असंही खंदारे म्हणाले आहेत.

एनसीबीनं मीडिया ट्रायल थांबवावी

एनसीबी ही केंद्रीय तपास यंत्रणा आहे परंतु ती यंत्रणा कायदेशीर काम करत नाही. एनसीबीनं मीडिया ट्रायल थांबवावी आणि आम्हाला कायदेशीर समन्स पाठवावं तर प्रभाकर NCB च्या चौकशीला सामोरे जाईल, परंतु एवढी मोठी केंद्रीय यंत्रणा कायद्याचं पालन करत नाही असा आरोप प्रभाकर साईलचे आरोप तुषार खंदारे यांनी केलाय.

पैशाची देवाण घेवणा झाल्याच गोसावीकडून मान्य

के.पी. गोसावी यांनी आता मान्य केलेल आहे की ह्या सगळ्यामध्ये पैशाची देवाण-घेवाण झालेली आहे. त्यामुळे आता या देवाण-घेवाण मधील सर्व सत्य लवकरच बाहेर येईल. प्रभाकर वरती जे काही आरोप लावले आहेत ते सर्व आरोप चुकीचे आहेत, असं देखील तुषार खंदारे यांनी म्हटलंय.

कुठल्याही मंत्र्याचा पाठिंबा नाही

आमच्या पाठीशी कोणत्याही मंत्र्याचा पाठिंबा नाही आहे. आम्ही देखील सामान्य व्यक्ती आहोत. जर, प्रभाकरने चॅट डिलीट केले असतील तर ते चॅट रिकव्हर सुद्धा होऊ शकतात.

एनसीबीला एफआयआर नोंदवण्यास 8 तास का?

ज्या दिवशी हे ड्रग्स प्रकरण झालं 2 ऑक्टोबरच्या रात्री त्या दिवशी NCB ने FIR नोंदवण्यासाठी आठ तासांचा कालावधी का लागला? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आठ तासा पर्यंत NCB चे अधिकारी कोणाची वाट पाहत होते? काय करत होते या सगळ्याचा देखील खुलासा झाला पाहिजे, असं देखील तुषार खंदारे यांनी म्हटलंय. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्या जात प्रमाणपत्र संदर्भात ची तक्रार मी स्वतः करेन, असंही खंदारे म्हणाले.

इतर बातम्या:

मनसेचं मिशन विदर्भ, अकोला महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरणः पुनमियाला जिल्हा व सत्र न्यायालयाचा तूर्तास दिलासा, सुनावणी चार आठवडे पुढे

Prabhakar Sail lawyer Tushar Khandare said NCB should stop media trial and follow legal process

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.