ठाकरे, पवार, काँग्रेसच्या ‘या’ जागांवर वंचितचा दावा; 48 पैकी 27 जागा मागितल्याने आघाडीची डोकेदुखी?

वंचित बहुजन आघाडीची कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना वंचित बहुजन आघाडीने पाच वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती. तसेच ज्या जागा जिंकण्याची खात्री होती, त्या लोकसभा मतदारसंघांची यादी आज विश्वास ठेवून महाविकास आघाडीला सादर केलेली आहे. तसेच महाविकास आघाडीला वंचितने एक प्रस्ताव देखील सादर केला आहे, असं वंचितने म्हटलं आहे.

ठाकरे, पवार, काँग्रेसच्या 'या' जागांवर वंचितचा दावा; 48 पैकी 27 जागा मागितल्याने आघाडीची डोकेदुखी?
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 8:55 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे अखेर लोकसभा जागांची मागणी केली आहे. वंचितने आघाडीकडे एकूण 27 जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे वंचितने 48 पैकी 27 जागांवर दावा केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्याच अनेक जागांवर वंचितने दावा सांगितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची आज बैठक होती. या बैठकीत वंचितने 27 जागांची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. वंचितने ज्या जागा मागितल्या त्याची नावेही व्हायरल झाली आहेत. त्यातील अनेक जागांवर काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार आहेत. तरीही वंचितने या जागा मागितल्या आहेत. काही काँग्रेस ज्या जागांवर सतत पराभूत होत आलेली आहे, अशा जागाही मागण्यात आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन याआधी वंचितने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली होती. त्या लोकसभा मतदारसंघाची यादी वंचितने तयार केली होती. आता महाविकास आघाडीने वंचितसोबत चर्चा सुरु केली आहे. तरीही वंचितने पूर्ण तयारी केलेल्या त्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला दिली आहे, असं वंचितने म्हटलं आहे.

चर्चा फलदायी

वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली असती, तर या यादीतील मतदारसंघातील जागा लढविल्या असत्या. पण, आता वंचितला आशा आहे की, या मतदारसंघांवर तीन पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होतील. दरम्यान, वंचितच्या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे, असं वंचितने म्हटलं आहे.

वंचितने मागितलेल्या जागा

अकोला – (ठाकरे वंचित बहुजन आघाडीसाठी सोडणार)

अमरावती -काँग्रेस

नागपूर -काँग्रेस

भंडारा-गोंदिया -काँग्रेस

चंद्रपूर -काँग्रेस

हिंगोली – तिढा कायम

उस्मानाबाद -शिवसेना ठाकरे गट

औरंगाबाद -शिवसेना ठाकरे गट

बीड -राष्ट्रवादी

सोलापूर -काँग्रेस

सांगली -काँग्रेस

माढा -राष्ट्रवादी

रावेर -राष्ट्रवादी

दिंडोरी -राष्ट्रवादी

शिर्डी – तिढा कायम

मुंबई साऊथ सेंट्रल – शिवसेना ठाकरे गट

मुंबई उत्तर मध्य -काँग्रेस

मुंबई उत्तर पूर्व -काँग्रेस

रामटेक -तिढा कायम

सातारा -राष्ट्रवादी

नाशिक -शिवसेना ठाकरे गट

मावळ -शिवसेना ठाकरे गट

धुळे -काँग्रेस

नांदेड -काँग्रेस

बुलढाणा – शिवसेना ठाकरे गट

वर्धा – तिढा कायम

वंचितचे दावे

ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडी अकोला, जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठीही आग्रही आहे

तर 48 पैकी शिवसेना ठाकरे गट एकूण 20 जागांवर निवडणूक लढवण्यास ठाम

वंचितचा प्रस्ताव

– महाविकास आघाडीचे सामाईक उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना पाठिंबा द्यावा.

– महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 ओबीसी उमेदवार असावेत.

– मविआच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही.

– महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत.

वंचितचा खुलासा काय?

वंचितची यादी व्हायरल झाल्यानंतर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे वंचितने तातडीने खुलासा केला आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेल्या मतदारसंघांची यादी ही गेल्या पाच वर्षांपासून ज्या जागांची तयारी पूर्ण ताकदीने करण्यात आली होती, त्या जागांची आहे. महाविकास आघाडीसोबत येण्याआधीची ही यादी असून, त्या अशा जागा आहेत, ज्या ठिकाणी वंचितला जिंकण्याची खात्री होती. त्यामुळे वंचितने अद्याप किती जागा हव्यात, याबाबत कोणतीही मागणी केलेली नाही.

महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे चार प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी वंचित बहुजन आघाडीने एक प्रस्ताव मविआला दिला असून, ज्या जागांवर युती होण्याआधी वंचितने तयारी केली आणि जिथे जिंकण्याची खात्री होती, त्या जागांची माहिती विश्वासाने मविआला दिली आहे. वंचितच्या या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आणखी एका बैठकीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.