प्रविण दरेकरांचा मनोज जरांगेंवर थेट हल्लाबोल; म्हणाले, समाजाने विश्वास टाकला, पण…

Pravin Darekar on Manoj Jarange Patil : प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणावर बोलताना प्रविण दरेकर यांनी जरांगेंवर टीका केली आहे. मनोज जरांगे जवळपास राजकीय झालेले आहेत, असं प्रविण दरेकर म्हणाले. वाचा सविस्तर...

प्रविण दरेकरांचा मनोज जरांगेंवर थेट हल्लाबोल; म्हणाले, समाजाने विश्वास टाकला, पण...
प्रविण दरेकर, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 5:24 PM

मनोज जरांगे यांनी भोळ्या भाबड्या मराठा समाजाचं समर्थन मिळवलं. पण आता त्यांच्या पोटात जी राजकीय महत्वकांक्षा होती, ती आता समोर आली आहे. यापूर्वी मुक मोर्चा झाले कुठलाही नेता त्यावेळी नव्हता. मराठा समाजाने एक विश्वास टाकला होता त्याला ठेच पोहोचवू नका. केवळ विधानसभेपुरता प्रश्न धगधगत ठेवायचा हा त्यांचा हेतू आहे. जरांगे जवळपास राजकीय झालेले आहेत. मराठा समाजाचे कवच घेऊन ते राजकीय भूमिका निभावत आहेत. बांगलादेश येथे काय मुद्दा आहे ते आधी समजून घ्या… माहिती न घेता त्याच्याशी संदर्भ जोडून वातावरन पेटवू नका, असं म्हणत भाजपच नेते प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

मराठा समाजासाठी अनेक संघटना काम करत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिले होते ते टिकले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर के रे पाटील यांनी मोर्चा आणने हे काही कळले नाही, असं म्हणत दरेकरांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे श्रावणात सोनिया दर्शन करायला दिल्लीला गेले असावेत. दुसऱ्यांना दिल्लीच्या पायाकडे गेले म्हणून टीका करायची. आता स्वतः मात्र खेटे स्वतः खेटे मारत आहेत. दिल्लीत ते सोनिया दर्शन घ्यायला गेले, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रविण दरेकरांनी टीका केली आहे. आपण पण आठ दिवस वाट पाहू नंतर बोलू. ते काय करतात आधी ते बघू. अडसूळ हे काही प्रमुख नेते नाही जागा वाटपाबाबत निर्णय आमचे प्रमुख नेते करतील, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी आनंदराव अडसूळ प्रकरणावर भाष्य केलं आहे.

भाजप बैठकीवर म्हणाले..

देवेंद्र फडणवीस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. येणाऱ्या निवडणुकीची रणनीती त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते. ते विभागावर बैठका घेत आहेत. आजही दोन विभागाची ते बैठक घेत आहेत, असं म्हणत दरेकरांनी भाजप बैठकीचा उद्देश सांगितला. संजय राऊत यांचा हल्ला कावळ्याचा हल्ला आहे. आम्ही त्यांना पोपट समजत होतो. पण त्यांनी आता नवीन ओळख सांगितली आहे. कावळ्याच्या चोचा मारणे येवढं त्याचे काम आहे. एक नवीन ओळख संजय राऊत यांची झालेली आहे, असं दरेकर म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.