गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधून रोज 12 जादा गाड्या, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर होणार

आता रेल्वे विभागाकडून मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेस्थानकापासून रोजच्या जाणाऱ्या रेल्वेंव्यतिरिक्त 12 विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. या जादा गाड्यांमुळे कोकणावासीयांचा प्रवास आणखी सुखकर झाला आहे.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधून रोज 12 जादा गाड्या, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर होणार
TRAIN FOR KONKAN

मुंबई : गणपती उत्सवासाठी भाविक तसेच चाकरमाने कोकणाची वाट धरतात. लोकांची गर्दी लक्षात घेऊ राज्य सरकार तसेच रेल्वे विभागाकडून कोकणात दरवर्षी जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. आता रेल्वे विभागाकडून मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेस्थानकापासून रोजच्या जाणाऱ्या रेल्वेंव्यतिरिक्त 12 विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. या जादा गाड्यांमुळे चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर झाला आहे. (railway department decided to start 12 extra railways for konkan amid ganeshotsav festival)

रोज 12 जादा रेल्वेगाड्या 

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी मुंबईतील कोकणवासी आपल्या गावी मोठ्या संख्येने जातात. याही वर्षी कोकणातील चाकरमान्यांसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रोजच्या जाणाऱ्या रेल्वे व्यतिरिक्त 12 विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यातून प्रवासी गावी जात आहेत. तर या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे.

लवकरच 8 वातानुकूलित विशेष गाड्या

या 12 जादा गाड्यांव्यतीरिक्त कोकणात मुंबई ते कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गणपती उत्सवाची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने या आधीही रेल्वेने 217 अधिक विशेष गाड्या उपलब्ध केल्या आहेत. आता प्रवाशांच्या सोयीसाठी वातानुकूलित 8 विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 2 सप्टेंबर रोजी जाहीर केले होते.

रत्नागिरीमध्ये नियमांत बदल, गावात पोहोचल्यांतर होणार कोरोना चाचणी

गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यात होणारी गर्दी लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती थेट गावातच केली जाणार आहे. त्याकरीता नवीन नियमावली जाहीर करण्यात आलीय. रेल्वे प्रशासन, एसटी विभाग आणि गुगल फॉर्मच्या मदतीने येणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची माहिती गोळा केली जाणार आहे.  गावात आलेल्या प्रत्येक चाकरमान्यांची प्राथमिक तपासणी आशा वर्करच्या मार्फत केली जाईल. त्यानंतर तपासणीअंती कोणालाही कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास अँटीजेन किंवा RTPCR चाचणी केली जाईल. याबाबतचा सर्व सूचना ग्रामकृती दल, सरपंच पोलीस पाटील यांना देण्यात आहेत. तसेच या कामासाठी सहकार्य न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे

दरम्यान, जादा रेल्वेगाड्या सोडल्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होण्यास मदत मिळणार आहे. मात्रस असे असले तरी प्रवाशांनी कोरोना नियमाचं पालन करावं असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

इतर बातम्या :

‘मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही, संजय राऊतांसारखा कंपाऊंडरही नाही’, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

राज्यात 90 टक्के शाळांत नियमांना डावलून फी वसुली, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान

जिथे काम करतो तिथेच घृणास्पद कृत्य, सहकाऱ्यालाही फसवलं, कंपनीला कोट्यवधींचा चुना, पुण्यातील धक्कादायक घटना

(railway department decided to start 12 extra railways for konkan amid ganeshotsav festival)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI