मुंबईत प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल 5 पटीने वाढ, कोरोना संक्रमण टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

रेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ केली आहे. लोकांनी निनाकारण रेल्वेस्थानकात गर्दी करणे टाळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात विनामास्क फिरल्यास तब्बल 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

मुंबईत प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल 5 पटीने वाढ, कोरोना संक्रमण टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
CORONA AND RAILWAY
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 11:07 PM

हिरा ढाकणे, मुंबई : सध्या निर्बंध शिथिल केले जात असले तरी कोरोना संसर्ग नव्याने वाढू नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने चांगलीच शक्कल लढवली आहे. रेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ केलीय. लोकांनी विनाकारण रेल्वेस्थानकात गर्दी करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात विनामास्क फिरल्यास तब्बल 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात 50 रुपयांची वाढ  

सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. राज्यात मंदिरं तसेच शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. परंतु निर्बंध शिथिल झाल्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने खरबदारी घेणे सुरु केलं आहे. रेल्वेस्थानकावर लोकांनी गर्दी करु नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यापूर्वी मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर हा 10 रुपये होता. आता नव्या दरांनुसार प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये करण्यात आले आहे. हे नवे दर 8 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. मुंबईतील सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकावर हा दर आकारण्यात येणार आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलाय.

मास्क न वापरणाऱ्याला 500 रुपयांचा दंड

तर दुसरीकडे प्लॅटफॉर्मचे तिकीट वाढवण्याबरोबरच रेल्वे मंत्रालयाने अन्य नियमसुद्धा आणखी कठोर केले आहेत. मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांविरोधात कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये मास्क न वापरल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. सनासुदीच्या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हे नियम लागू करण्यात आले आहेत.

कोरोना नियमावली 6 महिन्यांसाठी वाढवली

तसेच रेल्वे मंत्रालयाने कोविड-19 नियमावली आगामी सहा महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच पुढील निर्देश येईपर्यंत हीच कोरोना नियमावली राहील. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Aryan Khan Drugs Case | शाहरुख खानला मोठा धक्का, आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आता जामीन मिळणार का?

धोनी मैदान हरला, दीपक चहरनं मारलं, भर मैदानात प्रेमाचा सामना कुणी जिंकला? चर्चा त्या Video ची तर होणारच

Cruise Drugs Party | ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, NCB अधिकाऱ्यांनी आर्यनला काय विचारलं? वकिलांनी सांगितला सर्व घटनाक्रम

(railway ministry increased platform ticket to avoid corona infection in mumbai)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.