AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: एकनाथ शिंदेंना भेटलो उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन,राज ठाकरे स्पष्टच बोलले, प्रत्येक भेटीत राजकारण…केले मोठे भाष्य

Raj Thackeray Big Statements: राज ठाकरे यांनी परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावरून एकच चर्चा सुरू झाली. आज त्यांनी याविषयावर मोठे भाष्य केले. प्रत्येक भेटीत राजकारण शोधण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी याप्रकरणी लगावला.

Raj Thackeray: एकनाथ शिंदेंना भेटलो उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन,राज ठाकरे स्पष्टच बोलले, प्रत्येक भेटीत राजकारण...केले मोठे भाष्य
राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 1:35 PM
Share

Raj Thackeray Big Statements: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवा भेट घेतली. ठाणे येथे शिंदेंच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. तर दुसरीकडे मनसे-उद्धव सेनेत मीठाचा खडा पडतोय अशा चर्चा सुरू झाल्या. कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानंतर त्यानंतर या भेटीने चर्चांना हवा दिली. या भेटीबाबत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भेटीवर मोठे भाष्य केले आहे.

उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन

चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर एकमेकांना भेटायला नको का? प्रत्येकवेळी त्यातून राजकारणचं शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. काल एकनाथ शिंदे यांना भेटलो. उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन असे राज ठाकरे म्हणाले. आता तीन वर्षांनी निवडणुका आहेत. आता निवडणुका संपलेल्या आहेत. आज ते सत्तेत आहेत. आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर भेटायला नको का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

निकोप राजकारण राहिलं नाही

आपल्याकडे निकोप राजकारण राहील नाही कोणाला भेटल की युत्या यावर सुरुवात होते प्रत्येक वेळेला काही शोधलच पाहिजे .रस्त्याची बिकट परिस्थिती आहे. विकास म्हणजे रस्ते बांधणे म्हणजे नाही.ती सूज आहे.मूळ गोष्टीला हात घालत नाही. मुंबई ठाणे नाशिक येथे काम सुरू आहे.अनेकांकडे गाड्या आहेत त्या रस्त्यावर उभ्या राहतात.याला शिस्त राहिली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागील कारण काय?

अनेक इमारती मध्ये पार्किंग मधल्या गाड्या रस्त्यावर येतात.सगळीकडे जाम होऊन बसले आहे.शहरात येणारे मानस गाड्या येत आहे.मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो.त्यांनी भूषण गागाराणी यांनी सांगितलं.फुटपाथला लाल आणि काळा असं टाका चुकीच्या ठिकाणी पार्क केलं तर दंड या गोष्टी कानावर घातल्या. मी या गोष्टीसाठी गेलो होतो, त्यांना फाईल दिली, असे त्या भेटीचे कारण राज ठाकरे यांनी सांगितले.

शहराकडे येणार्‍या लोढ्यांवर भाष्य

शहराची रोजची स्थिती बिकट अन् भीषण अवस्थेला पोहचली आहे. शहरात येणारी माणसं थांबत नाहीत. सगळ्या गोष्टीचा विचका झाला आहे.या लोकांना आधार कार्ड,रेशन कार्ड कोण देत आपलीच माणसं देत आहेत त्यांच्यावर कधी कारवाही होणार? शहरात किती माणसं राहत आहेत. याचा विचार राज्यसरकार केंद्र सरकारने करावा. मी नागरिक म्हणून अध्यक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना सांगण गरज आहे.यासाठी मी पुन्हा भेटेल.निकोप राजकारण पूर्वी होत. प्रत्येक गोष्ट तिरस्कारण पाहील जात. याने काही हाती लागणार नाही. सरकारला ठणकावलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

Follow Us
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?