AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज अजित पवारांनी यायला हवं होतं, राज ठाकरे असं का म्हणाले? पत्रकार परिषदेत काय घडलं?

राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळासह निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीतील घोळाबाबत तक्रार केली. त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुधारण्याची आणि याद्यांमधील चुका त्वरित दूर करण्याची मागणी केली.

आज अजित पवारांनी यायला हवं होतं, राज ठाकरे असं का म्हणाले? पत्रकार परिषदेत काय घडलं?
| Updated on: Oct 15, 2025 | 3:18 PM
Share

महाराष्ट्रात सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने एकमेकांची भेट घेताना दिसत आहे. यामुळे येत्या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळासह मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीतील घोळाबाबत तक्रार केली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.

निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवला. तसेच हा घोळ सुधारण्याची मागणी केली. त्यानंतर राज ठाकरे यांना भविष्यातील युती आणि आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मिश्किलपणे अजित पवारांचा उल्लेख केला.

अजित पवारांनी यायला हवं होतं?

तुम्ही महाविकास आघाडीसोबत युती करणार का या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले.  मी २०१७ सोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्वाचं आहे. कुणाबरोबर होणार हा आताचा विषय नाही. २०१७ लाही मी तेच बोलत होतो. अजित पवारही त्यावेळी सोबत होते. त्यांनी यायला हवं होतं. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते. सांगत होते सर्व गोष्टी,” असे राज ठाकरे म्हणाले.

निवडणूक यादीत घोळ आहे. यादीतील घोळ राज्य आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीसमोर ठेवले. ते सुधारावेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे समाधान झाले आहेत. जे निवडणूक लढवतात त्यांचं समाधान झालं पाहिजे. ही रास्त मागणी आहे. यात गोंधळ आणि संभ्रम असण्याचं काम नाही. क्लिष्ट काहीच नाही. याद्यातील घोळ समोर ठेवल्यावर त्यांनी आणि राजकीय पक्षांनी याद्या सुधारल्या पाहिजे. सुधारूनच पुढे गेलं पाहिजे, असे राज ठाकरेंनी म्हटले.

हल्लीच हे विषय का येतात?

२०२४ विधानसभा निवडणूक झाली. २३२ जागा महायुतीच्या आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या जागा आल्यावरही सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष पाहिजे तो झालाच नाही. निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा एवढा हा सन्नाटा होता. ही कोणती लोकशाही आहे. या देशात या पहिल्या निवडणुका नाहीये. याच्या आधी अनेक निवडणूका झाल्या. इतके वर्ष निवडणुका सुरू आहे. हल्लीच हे विषय का येत आहे. त्यापूर्वी येत नव्हते, असा सवालही राज ठाकरेंनी केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...