Raj Thackeray : 96 लाख खोटे मतदार घुसवले, राज ठाकरेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गोप्यस्फोट
Raj Thackeray on Bogus Voter : गोरेगाव येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मोठी गडबड होण्याचे संकेत त्यांनी दिले.

Fake Voters in Local Body Election : गोरेगाव येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे. दिवाळीतच त्यांनी आरोपांचे फटाके फोडले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मोठी गडबड होण्याचे संकेत त्यांनी दिले. मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी मनसेने सुरू केली आहे. त्याअनुषंगाने मतदारयादी प्रमुखांचा एक भव्य मेळावा पार पडत आहे. मुंबईतील गोरेगाव(पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुंबईतील पदाधिकारी, मतदार यादी प्रमुख, गट प्रमुख आणि उपशाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी राज ठाकरे मतदान यादीविषयी काय आरोप करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी एकामागून एक बॉम्ब टाकले.
मतदार यादीत मोठा घोळ
त्यांनी आलेल्या मतदार यादीतील घोळावर राज्य निवडणूक आयोगाला खडसावले. विधानसभा निवडणुकीत इतके बहुमत मिळून सुद्धा जिंकलेल्या पक्षांना, त्यांच्या नेत्यांना शॉक बसला होता. त्यांनी जल्लोष केला नाही. मतदारांना तर हा धक्का होता. पण या पक्षांनी विजय साजरा केला नाही. कारण त्यांना मोठा धक्का होता असे राज ठाकरे म्हणाले.
96 लाख बोगस मतदार
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यापूर्वी राज ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार घुसवल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. यापूर्वीच्या निवडणुकीत बोगस मतदार भरलेच होते. आताही मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि इतर शहरात, गावागावात बोगस मतदार, खोटे मतदार भरले आहेत. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.यांना लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये यांना यांची सत्ता हवी असल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. हे सर्व सहज सुरू नाही. हे सर्व प्लान्ड आहे. महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असे पहिले कोण होते, तर वल्लभभाई पटेल हे होते, असे राज ठाकरे म्हणाले. आता त्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी आता बोगस मतदार घुसवण्यात येत आहे. त्यांना या सर्व संस्था त्यासाठी हातात हव्या आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन करतो की सतर्क राहा. प्रत्येक गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार आहे, त्यासाठी मतदार यादी प्रमुखांना मुद्दामहून बोलावल्याचे ते म्हणाले. आमच्या लोकांना सहकार्य करा असे आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केले.
