AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच… राज ठाकरेंनी थेट सत्ताधाऱ्यांनाच ललकारले

Raj tahckeray on Urban Naxal : शेकापच्या मंचावरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मोठे आव्हान दिले. अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला केले. त्यांनी थेट महायुती सरकारला ललकारले.

Raj Thackeray : अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच... राज ठाकरेंनी थेट सत्ताधाऱ्यांनाच ललकारले
राज ठाकरेंनी सरकारला ललकारले
| Updated on: Aug 02, 2025 | 2:03 PM
Share

शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावरून आज राज ठाकरे कडाडले. त्यांनी राज्य सरकारला कडवे आव्हान दिले. अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला केले. त्यांनी थेट महायुती सरकारला ललकारले. त्यांनी मुंबई, रायगड ठाण्याला परप्रांतियांचा विळखा पडल्याची जाणीव करून दिली. जमिनी विकताना मराठी माणसांनी सजग राहणे, जागरूक राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

अर्बन नक्षलवादावर सडेतोड विचार

आपण सर्व पक्षांनी नवीन विमानतळावर सर्वाधिक १०० टक्के मराठी मुलं आणि मुली कामाला लागले पाहिजे. बाहेरून कोणी तरी उद्योगपती येणार, जमिनी घेणार, धंदे घेणार आणि वाट्टेल ते थैमान घालणार. जमिनी आणि सर्व गोष्टीवर राज्य सरकारने कायदा आणला. तुम्ही कोण तर अर्बन नक्षल. शहरात राहणारे नक्षल. तुम्ही कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत, असे सडेतोच विचार राज ठाकरे यांनी शेकापच्या मंचावरून मांडले. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

धनदांडग्यांपासून व्हा सावध

यावेळी त्यांनी मुंबई आणि परिसरात धनदांडगे जमीन खरेदी करत असल्यावरही टीका केली. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो. मग आम्ही का नाही करायचा. रायगडमध्ये कोण येतं आणि जमिनी विकत घेतं माहीत नाही. उत्तरेतील अनेक धनदांडगे आहेत, ज्यांनी कोकणात जमिनीच्या जमीनीच विकत घेत आहेत. आमचेच लोक घेत आहेत. लोकांना कळत नाही की यातून आम्हीच संपणार आहोत. यापुढे उद्योगासाठी जमीन घ्यायला लोकं आले तर जमीनी विकायच्या नाहीत. तुमच्या कंपनीत आम्ही शेतकरी पार्टनर म्हणून येणार. आमचे मुले तुमच्या कंपनीत कामाला लागणारच. पण फुकट जमीन देणार नाही असं सांगा. उद्या याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून येतील, असा इशारा ही त्यांनी दिला.

मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग 

महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच उद्योग आणावे लागेल. नाही तर आणता येणार नाही. कोण कुठे येतोय, पत्ताच लागत नाही. संपूर्ण राज्यात कोणती प्रगती होते, हे फक्त मंत्र्यांना माहीत. का. तर तेच ठरवणार आणि उद्योगपतींशी व्यवहार करून गब्बर होणार. निवडणुकीत तुमच्या तोंडावर पैसे फेकून मते घेणार. एवढाच विचार सुरू आहे. खोलात जाऊन कोणीच विचार करत नाही. थोडक्यात जमिनी विकायच्या. तुमच्याकडे चुटूरपुटूर येणार. तेही काढायाल ते तयार आहे, अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.