AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का?; राज ठाकरे यांनी सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांची आज विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतानाच मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केलं.

Raj Thackeray : राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का?; राज ठाकरे यांनी सुनावले
Raj ThackerayImage Credit source: ani
| Edited By: | Updated on: Apr 17, 2023 | 1:34 PM
Share

अक्षय कुडकेलवार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांची आज विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतानाच मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केलं. हा सोहळा राजकीय हेतूने घेतला होता का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? असा प्रतिसवाल करत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारला सुनावले. काल खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारा दरम्यान उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण अत्यवस्थ झाले आहेत. या सर्वांवर नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. सकाळी कार्यक्रम करण्याची गरज नव्हती. वातावरण उन्हाने तापलेलं आहे. स्वत: आप्पासाहेबांना राजभवनावर बोलावून पुरस्कार देता आला असता. आताच्या दिवसात एवढ्या लोकांना बोलावून पुरस्कार देण्याची गरज नव्हती. झाली ती गोष्ट दुर्देवी आहे. कसं कुणाला जबाबदार धरणार कळत नाही. सकाळी न करता संध्याकाळी कार्यक्रम केला असता तर प्रसंग टाळता आला असता, असं राज ठाकरे म्हणाले.

हेतूपूर्वक केलं नाही

या घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे का? असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर हे हेतूपूर्वक कोणी केलेलं नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करावा असं मला वाटत नाही. कार्यक्रमाला इतर लोकांना बोलावण्यापेक्षा राजभवनावर बोलावून पुरस्कार दिला असता तर हा प्रसंग टाळता आला असता, असंही ते म्हणाले. राजकीय स्वार्थासाठी हा कार्यक्रम घडवून आणल्याचा आरोप होत आहे, असं विचारलं असता, राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? असा प्रतिसवाल त्यांनी केला.

आयसीयूत कुणाला पाठवू नये

आयसीयूत मी जात नाही. कुणालाही आयसीयूत पाठवू नये. आयसीयूतील रुग्णांना आपण भेटू नये. बाहेरच्या लोकांना भेटून आलो. रुग्णालय त्यांचं काम आहे, असं सांगतानाच एकूण 71 लोक अत्यवस्थ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यांच्यापैकी दोन जणांचा या रुग्णालयात मृत्यू झाला. तशी माहिती डॉक्टरांनी दिल्याचं राज ठाकरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.