मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द, कारण काय?; पुढचा मेळावा कधी?

मनसेचा उद्या होणारा मुंबईतील आणि परवा होणारा पुण्यातील मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. मनसेच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. (Raj Thackeray)

मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द, कारण काय?; पुढचा मेळावा कधी?
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 5:23 PM

मुंबई: मनसेचा उद्या होणारा मुंबईतील आणि परवा होणारा पुण्यातील मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. मनसेच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. मेळावा रद्द करण्यामागचं कारण मनसेकडून देण्यात आलेलं नाही. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

मनसेच्या ट्विटर हँडलवरून मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार 23 ऑक्टोरबर रोजी मुंबईत, तर 24 ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं मनसेच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, मेळावा रद्द करण्याचं कारण देण्यात आलेलं नाही. मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली असतानाच ऐनवेळी मेळावा रद्द करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

राज यांची तब्येत बिघडली

दरम्यान, राज ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याचं कळतं. त्यामुळेच उद्या आणि परवा होणारे मेळावे रद्द करण्यात आले आहेत. मात्र, राज यांना नेमकं काय झालं याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, 23 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात राज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. हिंदूत्व, भाजपबरोबरची युती, महापालिका निवडणुकीतील रणनीती आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर राज ठाकरे काय भाष्य करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. या मेळाव्यात राज यांच्या रडारवर कोण असेल याबाबतही सर्वांची उत्सुकता लागली होती. मात्र, ऐनवेळी मेळावा रद्द झाल्याने सर्वांचाच हिरमोड झाला आहे.

तयारी पूर्ण पण…

उद्या 23 ऑक्टोबर रोजी भांडूप येथे हा मेळावा होणार होता. या मेळावाच्या आयोजनाबाबत आज मनसे मुख्यालय राजगड येथे बैठक फार पडली होती. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली होती. या मेळाव्यातून राज ठाकरे मुंबईत मुंबई महापालिका आणि पुण्यात पुणे महापालिकेचं रणशिंग फुंकणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे मनसेच्या या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

हिंदुत्वाच्या दिशेने?

दोन दिवसांपूर्वीच कांचन गुरू माँ आणि राज ठाकरे यांची भेट कृष्णकुंज येथे भेट झाली होती. हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी योगदान देण्याचं आवाहन कांचन गुरु माँ यांनी केलं होतं. तसेच राज यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं होतं. त्यामुळे राज हिंदुत्वाकडे वळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे राज मेळाव्यात हिंदुत्वाची भूमिका जाहीर करतात का? याचीही उत्सुकता लागली होती.

संबंधित बातम्या:

Kirit Somaiya | अपारदर्शकता, सत्तेचा गैरवापर, घोटाळ्याची चौकशी होणार : किरीट सोमय्या

महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी भाजपची 8 महिन्यांपूर्वी बैठक, रोहित पवार यांच्या दाव्यानंतर खळबळ

शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार, FRP आणि अतिवृष्टीच्या मदतीवरुन राजू शेट्टी आक्रमक

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.