काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर या, सरनाईकांची सूचना योग्यच, भाजपशी युती करा; आठवलेंची मुख्यमंत्र्यांना साद

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jun 20, 2021 | 5:43 PM

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी त्याचं स्वागत केलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर या, सरनाईकांची सूचना योग्यच, भाजपशी युती करा; आठवलेंची मुख्यमंत्र्यांना साद
Ramdas Athawale

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याचं स्वागत केलं आहे. सरनाईक यांची सूचना योग्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. (ramdas athawale reaction to Pratap Sarnaik’s letter to CM Uddhav Thackeray)

रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी, असे आवाहन आठवले यांनी केले.

मुख्यमंत्र्यांना काम करणं कठिण

काँग्रेस आणि राष्ट्रवादी जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणे अवघड होत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी शिवसेना-भाजपने एकत्र यावे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलावा

काँग्रेस आणी राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेनेने भाजपशी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही, अशी सरनाईक यांची सूचना योग्य आहे. त्यांच्या सूचनेचा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांनी या पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजपशी युती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काय म्हणाले होते सरनाईक?

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दोनपानी पत्रं लिहून भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं होतं. पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. (ramdas athawale reaction to Pratap Sarnaik’s letter to CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब

साहेब, नेत्यांचे सहकार्य नाही, कुटुंबाच्या साथीने अर्जुनासारखा लढतोय; सरनाईकांची हतबलता आणि खदखद

प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

(ramdas athawale reaction to Pratap Sarnaik’s letter to CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI