AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत बदामाचे दर 680 वरुन थेट 1050 रुपये किलोवर, काजू-पिस्ताही महागला, कारण काय?

अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान देशभरासह मुंबईत देखील सुका मेव्याचे भाव अचानक गगनाला भिडू लागले आहेत. मुंबईतील होलसेल मार्केटमध्ये देखील ग्राहक अक्रोड, बदाम आणि इतर वस्तू खरेदी करतो, परंतु आता दर वाढले आहेत कारण बहुतेक मार्केटमध्ये सुकामेवा अफगाणिस्तानातून येत असतो.

मुंबईत बदामाचे दर 680 वरुन थेट 1050 रुपये किलोवर, काजू-पिस्ताही महागला, कारण काय?
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 8:48 AM
Share

मुंबई : अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान देशभरासह मुंबईत देखील सुका मेव्याचे भाव अचानक गगनाला भिडू लागले आहेत. मुंबईतील होलसेल मार्केटमध्ये देखील ग्राहक अक्रोड, बदाम आणि इतर वस्तू खरेदी करतो, परंतु आता दर वाढले आहेत कारण बहुतेक मार्केटमध्ये सुकामेवा अफगाणिस्तानातून येत असतो.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा परिणाम आता भारतीय बाजारावरही होत आहे. मुंबईत सुक्या मेव्याचे भाव वाढले आहेत. अफगाणिस्तानात बदल झाल्यानंतर मुंबईत बदामांची किंमत 680 होती, आता बदाम 1050 रुपये किलोग्रॅम झाले आहेत. याशिवाय बाजारात काजू, पिस्ताच्या किंमतीही वाढल्या आहेत. येत्या काही दिवसात आणखी भाव वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

पुण्यातील सुका मेवा दराची परिस्थिती काय?

अफगाणिस्तानात तालिबाने सरकार हातात घेतल्यानंतर देशातील अनेक भागात ड्राय फ्रूटचे दर कृत्रिमरित्या वाढवण्यास सुरुवात झालीये. सध्या देशात अफगाणिस्तानातून येणाऱ्या ड्राय फ्रूटचा पुरेसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दर सध्या तरी स्थिर आहेत. परंतु पुढील काही दिवसात केंद्र सरकारच्या धोरणानुसार दर वाढतील की नाहीत हे सांगता येणार नाही. परंतु पुढील काळात हे दर 10-15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतायेत. यासंदर्भात मार्केट यार्डातील ड्रायफुटचे व्यापारी नविन गोयल यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी दरांबाबत माहिती दिली.

पुण्यात घाऊक बाजारात ड्रायफ्रुटचे दर्जानुसार सध्याचे किलोचे दर

  • काळा मनुका – 250-350 रुपये
  • अंजीर – 600 – 800 रुपये
  • जरदाळू – 340 – 380 रुपये
  • खजूर – 100 – 1000 रुपये
  • शहाजिरा – 400 – 500 रुपये
  • खरजीरा – 480 रुपये
  • किशमिश – 280 – 600 रुपये

हेही वाचा :

Video: तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा समोर, काबुल विमानतळात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकावर गोळीबार

अफगाणिस्तानात तालिबान्यांचं ‘राज’, पण या तालिबानचा जन्म कसा झाला? पाकिस्तानने कसं पोसलं?, वाचा सविस्तर…

3 लाख अफगाण सैन्य असतानाही, 60 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा कसा मिळवला? वाचा काय आहेत मुख्य कारणं

व्हिडीओ पाहा :

Rate of Dry fruits in Mumbai increases know why

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.