Sanjay Raut: पंतप्रधान मोदी, शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा घेतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut on PM Narendra Modi: आज बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने दोन्ही शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील विविध शहरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. तर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरुन खासदार संजय राऊतांनी त्यांना खोचक टोला लगावला.

Sanjay Raut: पंतप्रधान मोदी, शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा घेतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संजय राऊतांचा खोचक टोला
संजय राऊत
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 23, 2026 | 2:35 PM

Sanjay Raut on Eknath Shinde: आज बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती आहे. जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा अशी ओरड सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या आठवणीत समाज माधम्यांवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून खासदार राऊत यांनी भाजपसह मोदींवर निशाणा साधला. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही ते बरसले. तर केडीएमसीच्या वादावर त्यांनी भाष्य करणे टाळले.

आता शिंदेंकडून प्रेरणा घेणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला. बाळासाहेब ठाकरे हे कसे त्यांचे मार्गदर्शक होते. आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली. आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली. त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला कशी दिशा दाखवली.अशा प्रकारची भूमिका शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहताना मोदी यांनी मांडली.पण त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं.आता मोदी एकनाथ शिंदे यांच्याकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शक घेतात का? असा खोचक टोला राऊतांनी यावेळी लगावला.

लोकमान्य टिळकानंतर बाळासाहेब ठाकरे हे लोकमान्य नेते होते. आज शिवसेनेतर्फे जनशताब्दी वर्षानिमित्त षणमुखानंद हॉलला एक कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे हजर असतील अशी महिती संजय राऊत यांनी दिली. बाळासाहेबांनी देशाला आणि महाराष्ट्राला फार मोठा विचार दिला. तो म्हणजे भक्कम एकजुटीचा.मराठी माणूस असेल अथवा हिंदू माणूस असेल, ऐक्याची वज्रमूठ ही कोणत्याही संकटांशी सामना करू शकते. त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखवले. सामान्य माणसाला त्यांनी शूर करून दाखवलं. तर त्याच्या न्यायहक्काची जाणीव करून दिली.त्यामुळं बाळासाहेबांचं स्मरण आम्हाला सारखं होत असतं. महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच होणार नाही, असे राऊत म्हणाले. तर यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे सेना- मनसे युतीवर भाष्य करणं टाळलं.