VIDEO: ईडीनेही बोलावलं होतं म्हणून राऊतांना धास्ती; सोमय्यांनी वाचून दाखवलं रश्मी ठाकरेंचं ‘ते’ पत्र

शिवसेनेचे (shivsena) अंतर्गत राजकारण मला समजत नाही. संजय राऊत (sanjay raut) अडचणीत आले होते, राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं. राऊतांना त्याची धास्ती वाटते. सुजीत पाटकरने (sujit patkar) काय केले हेही माहीत नाही.

VIDEO: ईडीनेही बोलावलं होतं म्हणून राऊतांना धास्ती; सोमय्यांनी वाचून दाखवलं रश्मी ठाकरेंचं 'ते' पत्र
संजय राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं म्हणून त्यांना धास्ती वाटतेय; किरीट सोमय्यांचा दावा
गिरीश गायकवाड

| Edited By: भीमराव गवळी

Feb 17, 2022 | 6:23 PM

मुंबई: शिवसेनेचे (shivsena) अंतर्गत राजकारण मला समजत नाही. संजय राऊत (sanjay raut) अडचणीत आले होते, राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं. राऊतांना त्याची धास्ती वाटते. सुजीत पाटकरने (sujit patkar) काय केले हेही माहीत नाही, मी दिल्लीला जाऊन तक्रार करुन आलो. आता हे राऊतांनी हे प्रकरण रश्मी ठाकरे, त्यांच्या भावाच्या गळ्यात टाकलं, असा दावा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे अध्यक्ष आहेत. मारो, ठोको, मार डालो, मी जाणार कोर्लईला. मी कोल्हापूरला गेलो होतो. सगळीकडे गेलो. जिथे तक्रार दिली. त्याचा पाठपुरावा करायचा आहे. याचं उत्तर तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी देऊ शकतो, तो देत नाही, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. तसेच जानेवारी 2019मध्ये रश्मी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्रंही वाचून दाखवलं.

हे 19 बंगले रश्मी उद्धव ठाकरेंच्या नावाने केले गेले. मला माहितीच्या अधिकारात मिळालेले कागदपत्र देतो, उद्धव ठाकरेंच्या उद्धट सेनेची उद्धटगिरी बघा. काही लोकांनी सरपंचाची मुलाखत व्हायरल केली, महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या समोर हसं करुन घेऊ नका. सरपंचांनी मे 2019 मध्ये 19 घरं नावे केली, माझा वाद सरपंचाशी नाही. मुख्यमंत्र्यांशी आहे. उद्धव ठाकरेंचा घोटाळा उघड केला तेव्हा प्रॉपर्टी टॅक्स भरला गेला. बाप दाखव नाही तर श्राद्ध घालं, हे माझ वाक्य नाही, संस्कृती नाही. अरे आमचा मुख्यमंत्री खोटं कसा बोलणार? जानेवारी 2019, नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी जे अॅग्रीमेंट 2014 मध्ये केलं त्यातही घरांचा उल्लेख आहे. म्हणून मी तक्रार केली की घरं चोरीला गेली आहेत, असं सोमय्या म्हणाले.

मी थांबलो होतो, पण त्यांनीच उकरून काढलं

मुख्यमंत्री आहेत म्हणून मी थांबलो होतो, रश्मी वहिनाींच्या नावे जागा असल्याने थांबलो होतो. पण संजय राऊत यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. सनम हम तो डुबेंगे, ठाकरे साहब तुमकोही लेके डुबेंगे, असं राऊतांना म्हणायचं दिसतं. पाटणकर बोलत नाहीत. रश्मी वहिनी बोलत नाहीत. राऊतांना बोलायची गरज काय होती? संजय राऊत मी डॉक्युमेंटशिवाय एक शब्द बोलत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पाटकरवर गुन्हा का नाही?

मूळ मुद्दा सुजीत पाटकर याचा आहे. हजारो लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्याच्यावर आक्षेप नाही. भुजबळाची प्रॉपर्टी बघायला गेलो तर गुन्हा दाखल करता. सुजीत पाटकरवर गुन्ंहा दाखलही नाही. हे डायव्हर्ट करण्यासाठी 50 लाख कोटींचा घोटाळा काढला आहे. धन्य आहेत, असं ते म्हणाले.

डोक्यावर बंदूक ठेवली, त्याला समोर आणा

मी तक्रार करत नाही. किरीट सोमय्या जर ऊठसूठ विनापुरावा बोलत असेल, तर त्याला प्लॅटफॉर्म देऊ नका. व्हेरिफाय करा. ईडीने ज्या डेकोरेटरच्या डोक्यावर बंदुक ठेवली, असं म्हणाले. तो डेकोरेटर कोण? कधी झालं? पुरावे द्या. पोलिसात तक्रार करा. तुम्ही उपराष्ट्रपतींना पत्रं लिहिताना ज्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली त्याला समोर आणायला नको. गुन्हा दाखल करायला नको? असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

वेडसर माणूस आहे तो, महाराष्ट्रातल्या दोन फेसबूक विचारवंताच्या उडीत किरण मानेंकडून थेट निकाल

सोमय्यांना पोलिसांची नोटीस, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन भेटावे, भुजबळांनी काय फोडला बॉम्बगोळा?

PMC Election | ‘या’ कारणामुळे पुणे महापालिकेतील प्रारूप आराखड्यातील हरकती व सूचनांवर होणार गटनिहाय सुनावणी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें