AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस बरे व्हावेत यासाठी तुळजाभवानीकडे प्रार्थना, सरकार त्यांची काळजी घेईल : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना वारंवार काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यांनी ऐकलं नाही, असं म्हटलं आहे. (Sanjay Raut said MVA govt take care of  Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस बरे व्हावेत यासाठी तुळजाभवानीकडे प्रार्थना, सरकार त्यांची काळजी घेईल : संजय राऊत
| Updated on: Oct 25, 2020 | 10:41 AM
Share

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना वारंवार काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यांनी ऐकलं नाही, असं म्हटलं आहे. परिस्थिती किती गंभीर आहे, हे आज फडणवीसांना समजले असेल. फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो,असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut said MVA govt take care of  Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला सूचना दिल्या असल्याची माहिती राऊत यांनी दिली. देवेद्रं फडणवीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल, असंही राऊत म्हणाले. शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर सभागृहात होतो आहे. कोरोना नसता तर आज शिवतीर्थावर आज शिवसैनिकांचा महापूर दिसला असता.

मनाची आणि जनाचीही लाज आहे म्हणून दसरा मेळावा सभागृहात घेत आहोत. विरोधकांनी बिहारमध्ये जनाची आणि मनाचीही पाळली नाही. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मेळावा घेतला. भागवत आमच्यासाठी आदर्श, पण संघाच्या मेळाव्याबाबत विरोध काय काय म्हणतील?

मुख्यमंत्री सीमोल्लंघन करणार आहेत, ते कोणत्या प्रकारचं हे संध्याकाळी समजेल. हिंदुत्व हे आमच्यासाठी लाखमोलाचे आहे. मोफत कोरोना लसीवरुन सुरु असलेल्या राजकारणावर संजय राऊत यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लसीचं राजकारण करण्याएवढे कोत्या मनोवृत्तीचे नाहीत. नवाब मलिकांनी घोषणा केली असेल तर त्यांनी त्याबाबत चर्चा केली असेल, असं राऊत म्हणाले.

संंबंधित बातम्या :

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर समाजाने बहिष्कार टाकावा : संजय राऊत

VIDEO : ‘या’ बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय, संजय राऊतांची मागणी

(Sanjay Raut said MVA govt take care of  Devendra Fadnavis)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...