‘गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात’, संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या जागावाटपावर टीका केली. महायुतीचं जागावाटप आता अंतिम टप्प्यावर आलं आहे. या जागावाटपात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याचं चित्र दिसत आहे. तर इतर मित्रपक्ष आणि छोट्या पक्षांसाठी देखील जागा सोडण्यात आल्याचं समजत आहे. याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी अतिशय खोचक शब्दांत टीका केली.

'गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात', संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा
खासदार संजय राऊतImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 7:32 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज महायुतीवर निशाणा साधला. भाजपकडून आता छोट्या मित्रपक्षांना सोबत घेतलं जात आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांनी सडकून टीका केली. “गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. जे मांडलिक, गुमाल असतात, जे आश्रीत असतात त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो. कधी आम्ही मातोश्रीवर बसतो, कधी सिल्व्हर ओकला बसतो, कधी अन्य ठिकाणी बसतो. आमच्यात जे काही चाललं आहे ते या राज्यात आहे. आम्हाला उठसूट दिल्लीला जावून नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून बसावं लागत नाही”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“ते गळालाच लावतात. स्वत:हून मिळवत नाहीत. मग माणसं गाळत जातात. महादेव जानकर यांच्याबाबत बोलणार नाही. तो त्यांचा निर्णय आहे. बारामतीत सुप्रिया सुळे या विक्रमी मतांनी जिंकून येतील, याबाबत आमच्या मनात शंका नाही. आम्ही तीनही पक्ष तिथे कामाला लागलो आहोत. मी स्वत: बारामती मतदारसंघात तीन सभा केल्या आहेत. वेळ पडली तर उद्धव ठाकरे स्वत: बारामतीत सभा घेतील. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. बारामतीत कोणीही येऊद्या, सुप्रिया सुळे या प्रचंड मतांनी जिंकून येतील. तिथे लढायला कुणी तयार नाही. त्यामुळे असे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याला गळाला लावा त्याला गळाला लावा आणि गळ्यात घाला”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

ठाकरे गटाची यादी कधी जाहीर होणार?

ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “शिवसेनेत यादी वगैरे जाहीर करण्याची प्रथा आणि परंपरा नाही. शिवसेनेत संभाव्य उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या जातात. महाराष्ट्रात बहुसंख्य लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही आता महाविकास आघाडीत आपण असल्यामुळे आणि मीडियाच्या सोयीसाठी आम्ही उद्या उमेदवार जाहीर करु. उद्धव ठाकरे यांनी जवळपास सर्वच उमेदवार निश्चित केले आहेत. काँग्रेसने बरेच उमेदवार दिल्लीतून जाहीर केले आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील काल मातोश्रीवर आले होते. त्यांच्याकडून असं समजतंय की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही पूर्ण तयारी झाली आहे. आम्हाला असं वाटत नाही की, एखाद्या जागेवरुन वाद, संघर्ष तणाव आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आहे?

“वंचित बहुजन आघाडी हा आजही महाविकास आघाडीतला सन्मानीय घटक पक्ष आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे सगळ्यांचे नेते आहेत. त्यांच्याशी आम्ही वारंवार संवाद साधतोय. आमच्या तीनही पक्षांच्या लोकांनी त्यांच्याशी डायलॉग कायम ठेवलेला आहे. आघाडीत जागावाटप करताना थोडसं मागेपुढे होतं. आम्ही वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिला. त्यामध्ये अकोलासुद्धा आहे. त्यांना चार जागांचा प्रस्ताव मान्य नाही. तरीही आम्ही सर्व प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करु. वंचित आमच्याबरोबर असावी, अशी आमची भूमिका आहे, तशीच महाविकास आघाडीसोबत राहावं, अशी प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. त्यांनी त्याबाबतीत कोणताही संकोच ठेवलेला नाही”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत येणार?

“स्वाभिमानी शेतकरी संघटनेते प्रमुख राजू शेट्टी आणि आमची चर्चा सुरु आहे. हातकणंगले जागा शिवसेनेची आहे. तिथे शिवसेनेचा उमेदवार गेल्या निवडणुकीत जिंकून आल्यामुळे ती जागा शिवसेनेच्या वाट्यात आहे. त्यामुळे त्या जागेसंदर्भात काय करायचं? याचा निर्णय शिवसेना महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेतील. राष्ट्रवादीचे जयंत पाटील कोल्हापूरला आहेत. ते कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा अशा जागांचा आढावा घेत आहेत. तिकडचं राजकारण ते जास्त जवळून ओळखतात. त्यांच्यासोबत उद्या चर्चा करु”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचा प्लॅन बी काय?

“सांगली शिवसेनेचा लढणार आणि भिवंडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. त्यावरील चर्चा जवळपास संपली आहे. प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरु आहे. त्यांच्यासोबत निरंतर चर्चा करावी असं ते व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यासोबत बोलल्याने आम्हाला ऊर्जा मिळते. तसेच आम्ही प्लॅन ए, बी, सी असा ठेवत नाही. तुम्ही आमच्याबरोबर यायला हवं. आम्ही तुमच्याबरोबर राहू. हाच आमचा प्लॅन आहे. महाराष्ट्रात एकत्र राहायचं आहे हाच प्लॅन ए आहे. या देशातील हुकूमशाही पूर्णपणे संपवायची हाच प्लॅन ए आहे”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.