AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत? विजय वडेट्टीवारांचे मोठे सूचक वक्तव्य, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?

Vijay Wadettiwar on Sharad Pawar NCP NDA: उद्धव सेना फुटीनंतर राज्यात राजकारण नाट्यमय वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत सत्तेत घरोबा करण्याची चर्चा होत आहे. त्यावर प्रतिक्रियाही उमटत आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत? विजय वडेट्टीवारांचे मोठे सूचक वक्तव्य, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?
विजय वडेट्टीवारांचे मोठे सूचक वक्तव्य
| Updated on: Jul 07, 2026 | 12:51 PM
Share

Vijay Wadettiwar on Sharad Pawar NCP NDA: डिलिमिटेशन आणि महिला विधेयकांसाठी भाजपने कंबर कसलेली आहे. त्यातच पश्चिम बंगालसह महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला. तरीही अजून काही खासदारांचा पाठिंबा मिळवणे गरजेचे आहे. या घडामोडीत शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत घरोबा करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत. हा आकडा मॅजिक फिगर गाठण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी शरद पवार राष्ट्रवादीला पुरोगामी महाराष्ट्राची आठवणही करून दिली आहे.

भाजपसोबत जाणार पवार?

भाजपसोबत सत्तेत वाटेकरी होण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादीत हालचाली वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेत थेट सहभागी होणार की, बाहेरून पाठिंबा देणार यावर चर्चा सुरू असल्याची गोटातील माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे हेविवेट नेते विनोद तावडे यांच्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची कुणकुण बाहेर येत आहे. आमदार रोहित पवार यांनी हे वृत्त समोर येताच ते फेटाळले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

आता चर्चेची गरज नाही, पण चर्चा सुरू आहे

“आज चर्चा करण्याला अर्थ नाही. पण चर्चा सुरू आहे, एवढं मात्र नक्की आहे. आता त्यांना वैचारिक की सत्तेचा यापैकी कोणता रस्ता सोयीस्कर वाटतो. सत्ता हवी आहे की, पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामीत्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीआई फुले यांच्या विचारावर विश्वास ठेवायचा आहे.धन, संपत्ती, सत्ता आणि मंत्री यावर विश्वास ठेऊन काम करायचं आहे, हे त्यांनी ठरवायचं आहे, मला त्यावर भाष्य करण्याची गरज नाही.” असे मोठे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

वडेट्टीवार यांनी चर्चा सुरू असल्याचे मोठे संकेत दिले आहेत. तर त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुरोगामीत्वाचा आरसाही दाखवला आहे. राज्यात ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीचे वारे वाहत असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचवेळी ही मोठी राजकीय घडामोड समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे